शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

कचरा प्रकल्पाला अंबरनाथचा होकार; पालिकेची झाली विशेष सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 22:44 IST

आर्थिक बाबींवर झाली चर्चा, बदलापूर पालिकेचा अद्याप निर्णय नाही

अंबरनाथ : स्पेनच्या तंत्रज्ञानावर आधारित घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्यासाठी अंबरनाथ पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांसाठी एकत्रित प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी अंबरनाथ पालिकेने होकार दिला आहे तर बदलापूर पालिका या संदर्भात अद्याप निर्णयाच्या प्रक्रियेत आहे. अंबरनाथ पालिकेत या संदर्भात विशेष सभा गुरूवारी घेण्यात आली. या सभेत प्रकल्पाच्या आर्थिक बाबीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.अंबरनाथ शहरात घनकचरा व्यवस्थापनच्या अंतर्गत कचºयावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याच्या बाबतीत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी विशेष सभा झाली. या सभेत स्पेनच्या तंत्रज्ञानावर आधारित कचºयावर प्रक्रिया करणारी यंत्रणा ही अंबरनाथ आणि बदलापूर शहरात राबविण्याचा विचार करण्यात आला. पालिकेला आर्थिक भार सांभाळावा लागणार असल्याने भाजपचे नगरसेवक तुळशीराम चौधरी यांनी या प्रकल्पासोबत इतर प्रकल्पांवरही विचार करण्याची सूचना केली.या प्रकल्पात पालिकेला आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे. तसेच वर्षाकाठी काही रक्कमसुद्धा पालिकेला द्यावी लागणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासोबत इंदूर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनेच्या प्रकल्पाचा विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तेथे पालिकेला वर्षाला रॉयल्टीच्या स्वरुपात आर्थिक मदत होते.त्यामुळे पालिकेला आर्थिक लाभ होईल अशा प्रकल्पाचाही विचार करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. यावर काँग्रेस नगरसेवकांनीही बाजू मांडताना हा प्रकल्प महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून राबवत असताना त्यात चूक होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना केली. केवळ प्रकल्प चांगला दिसत आहे म्हणून तो राबविण्यापेक्षा इतर पर्यायांचेही अवलोकन करावे. पालिकेचा निधी या प्रकल्पावर खर्च होणार असल्याने तो प्रकल्प अपयशी ठरणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. तसेच या प्रकल्पाला पालिकेचा निधी कमीतकमी लागावा यासाठी अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.वर्षाचा येणारा खर्च हा कमी कसा होईल यावर विचार करुन निर्णय घेण्याची मागणी केली. प्रकल्प उभारत असताना अंबरनाथ पालिका ही प्रकल्प राबविणारी प्रयोगशाळा होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली. पालिकेकडे आलेल्या तीन प्रस्तावांपैकी इतर दोन प्रस्ताव सभागृहात चर्चेला न आणल्याने याबाबत काँग्रेस नगरसेवकांनी अधिकाºयांना धारेवर धरले. तीन प्रस्ताव आलेले असतांना त्याचे अवलोकन करण्यासाठी ते तिन्ही प्रकल्प सभागृहासमोर आणण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.स्पेनच्या प्रकल्पात ओला आणि सुका कचरा एकत्रित असला तरी त्याचे वर्गीकरण करण्याची यंत्रणा त्यात आहे. त्यामुळे नागरिकांचा त्रास या प्रकल्पामुळे कमी होणार आहे. मात्र ते करत असताना या प्रकल्पाचा खर्च नागरिकांवर पडणार नाही याची दक्षता घेण्याची गरज काँग्रेस नगरसेवकांनी व्यक्त केली.तसेच अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांची एकत्रित प्रक्रिया केंद्र उभारतांना नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना यावेळी करण्यात आली. नगरसेविका वृषाली पाटील यांनी सभागृहात आधी झालेले प्रयोग आणि त्याचे अपयश यावर चर्चा केली. तर नगरसेवक उमर इंजिनियर यांनी गांडूळखत प्रकल्पाचे योग्य नियोजन न केल्याने त्याचा त्रास स्थानिक रहिवाशांना झाला आणि त्यातून तो प्रकल्प बंद करावा लागला. तशा प्रकारची समस्या पुन्हा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना केली.समस्या कशी सुटेल याचा विचार कराया विषयावर चर्चा करताना नगरसेवक निखील वाळेकर यांनी सभागृहात स्पेनच्या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देताना हा प्रकल्प अंबरनाथसाठी कसा योग्य आहे याची माहिती दिली. तर नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी या प्रकल्पातून नफा शोधण्यापेक्षा कचºयाची समस्या योग्य प्रकारे कशी सुटेल याचाच विचार करण्याची गरज व्यक्त केली. या सविस्तर चर्चेनंतर दोन्ही शहरांसाठी एकत्रित प्रकल्प राबविण्यावर एकमत करुन हा विषय मंजूर करण्यात आला.या प्रकल्पासंदर्भात स्पष्टीकरण करतांना शहरातील कच-याच्या स्वरुपात बाहेर पडणारे बांधकाम साहित्य यावर देखील प्रक्रिया करुन त्या बांधकाम साहित्याचा पूर्णवापर करण्यात येणार आहे. त्या अनुशंगाने देखील सविस्तर माहिती देण्यात आली. मात्र हे बांधकाम साहित्यावर प्रक्रिया कशी होणार याचे स्पष्टीकरण कोणीही सभागृहात दिले नाही.स्पेनचा प्रकल्प कसा योग्य आहे हे सांगण्याचा आटापीटा सत्ताधा-यांचा दिसत होता. तर पर्यायी प्रकल्पांचाही विचार करावा असा सुर विरोधकांमधुन बाहेर पडत होता. मात्र सत्ताधारी स्पेनच्या प्रकल्पावर ठाम असल्याने विरोधकांनी देखील विरोधाला विरोध नको म्हणून प्रकल्पाला समर्थन दर्शविले. मात्र खर्चाबाबत स्पष्टीकरण देखील मागविण्याची मागणी केली.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न