शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ स्थानकाचा लवकरच कायापालट, १ नोव्हेंबरपासून वाढीव फेऱ्यांचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 18:04 IST

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मध्य रेल्वेवरील अंबरनाथ स्थानकाचा संपूर्ण कायापालट होणार असून अंबरनाथवासीयांना लवकरच नवा होम प्लॅटफॉर्म, ४ एस्कलेटर्स, नवा एफओबी आणि रेल्वेची नवी इमारत मिळणार आहे.

डोंबिवली: खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मध्य रेल्वेवरील अंबरनाथ स्थानकाचा संपूर्ण कायापालट होणार असून अंबरनाथवासीयांना लवकरच नवा होम प्लॅटफॉर्म, ४ एस्कलेटर्स, नवा एफओबी आणि रेल्वेची नवी इमारत मिळणार आहे. मुंबई दिशेकडील एफओबीचा देखील विस्तार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, ठाण्यापुढील प्रवाशांसाठी रेल्वेच्या १६ वाढीव फेऱ्या एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.अंबरनाथ स्थानकातील वाढत्या गर्दीवर उतारा म्हणून खा. डॉ. शिंदे यांनी अंबरनाथ स्थानकात पश्चिम दिशेला होम प्लॅटफॉर्म बांधण्याची मागणी केली होती. तसेच, मे महिन्यात रेल्वे अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात जागेची पाहणी देखील केली होती. मंगळवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्यासमवेत यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आ. डॉ. बालाजी किणीकर, मध्य रेल्वेचे विभागीय उपव्यवस्थापक आर. के. गोयल, एमआरव्हीसीचे परमिंदर सिंग, आयआरसीटीसीचे अरविंद मालखेडे यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, धनंजय बोडारे, नगरसेवक सुभाष साळुंके, रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.खा. डॉ. शिंदे यांनी अंबरनाथ येथे होम प्लॅटफॉर्मची मागणी लावून धरली होती. श्री. शर्मा यांनी हा प्रकल्प एमयूटीपी ३ अंतर्गत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती याप्रसंगी दिली. जागतिक बँकेची मंजुरी एक-दोन दिवसात अपेक्षित असून येत्या दोन महिन्यात निविदा प्रक्रिया होईल, अशी माहिती याप्रसंगी देण्यात आली.या होम प्लॅटफॉर्मसह स्थानकाच्या मध्यभागी पादचारी पुलाची मागणी देखील खा. डॉ. शिंदे यांनी केली होती. ती देखील मान्य झाली असून नवा सहा मीटर रुंद पूल होणार आहे. यामुळे कर्जत दिशेकडील पुलावरील गर्दी कमी होणार आहे. या पुलाला तीन एस्कलेटर्स बसवण्यात येणार असून कर्जत दिशेकडील जुन्या एफओबीला देखील प्लॅटफॉर्म क्र. तीनवर एस्कलेटर बसवण्यात येणार आहे. स्थानकाची जुनी प्रशासकीय इमारत पडून त्याजागी दोन मजली इमारतही बांधण्यात येणार आहे.

एक नोव्हेंबर पासून वाढीव फेऱ्यांचा दिलासाएक नोव्हेंबर पासून मध्य रेल्वेवर गर्दीच्या वेळेत १६ वाढीव फेऱ्या सुरू होणार असून त्या सर्व ठाण्यापुढील प्रवाशांसाठी आहेत. ठाण्यापुढील वाढती गर्दी लक्षात घेता अधिकाधिक फेऱ्या ठाण्यापुढील स्थानकांसाठी सुरू करण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली होती. त्यानुसार दादर-बदलापूर (२), दादर-टिटवाळा (२), दादर-डोंबिवली (६) आणि कुर्ला - कल्याण (६) अशा वाढीव फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. या वाढीव गाड्यांमध्ये महिलांसाठी तीन ज्यादा डबे राखीव ठेवण्यात येणार आहेत.

दिवा स्थानकातही होणार नवा एफओबीदिवा स्थानकात कल्याण दिशेला एफओबी बांधण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली होती. ती देखील मंजूर झाली असून स्थानकाच्या मध्यभागी असलेल्या एफओबीचा देखील पूर्व दिशेला विस्तार करण्यात येणार आहे. मुंबई दिशेकडील जुना एफओबी देखील रुंद करण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी केली असता या ठिकाणी नवा एफओबी बांधण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने दाखवली. हे तिन्ही एफओबी स्काय वॉकच्या माध्यमातून जोडण्याबाबत ठाणे महापालिकेला सूचना करण्यात आल्याचेही खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले. दिवा पूर्व येथे मुंबई दिशेला तिकीट ऑफिस बांधण्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल