शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अल्युफिन कंपनी स्फोट प्रकरण : कंपनी मालक आणि सुपरवायझरवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 16:44 IST

 येथील एमआयडीसी फेज 2 मधील अल्युफिन कंपनीत सोमवारी झालेल्या कॉम्प्रेसर स्फोटाप्रकरणी कंपनीचे मालक निलय अजित घोलकर आणि सुपरवायझर जोखम हरीहर राय व अन्य व्यक्तींविरोधात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा मानपाडा पोलिसांनी दाखल केला आहे. 

डोंबिवली: येथील एमआयडीसी फेज 2 मधील अल्युफिन कंपनीत सोमवारी झालेल्या कॉम्प्रेसर स्फोटाप्रकरणी कंपनीचे मालक निलय अजित घोलकर आणि सुपरवायझर जोखम हरीहर राय व अन्य व्यक्तींविरोधात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा मानपाडा पोलिसांनी दाखल केला आहे. दरम्यान, या स्फोटाच्या घटनेत गंभीर जखमी झालेले कामगार राजेंद्र यशवंत जावळे यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा होत झाल्याची माहीती एम्स रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली,सोमवारी सकाळी साडेआठ ते पावणोनऊच्या दरम्यान अल्युफिन कंपनीत कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन कंपनीमधील दोन कामगार जखमी झाल्याची घटना घडली. यात कमरेपासून डावा पाय पुर्णत: निखळल्याने गंभीर जखमी झालेल्या जावळे यांना तातडीने नजीकच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रारंभी त्यांची प्रकृती चिंताजनक होती त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली परंतू आता त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्याची माहीती तेथील डॉ तनुजा गायकवाड यांनी दिली. जावळे यांचा डावा पाय पुर्णपणो या स्फोटात तुटला पण त्यांच्या उजव्या पायावर देखील तीन ठिकाणी फ्रॅर आहे त्यामुळे त्याठिकाणी देखील शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या घटनेत उडालेला कॉम्प्रेसरचा अवशेष रस्त्यावरून जाणा-या मोटारसायकलवर आदळला होता. त्यामुळे या गाडीवरील हुसेन मुजावर आणि सतीश पाटील हे दोघेही किरकोळ जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कंपनीवर निष्काळजी, हलगर्जीपणाचा गुन्हास्फोटाच्या घटनेप्रकरणी कंपनी मालकासह सुपरवायझर आणि इतर संबंधित व्यक्तींवर हलगर्जी आणि निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाखाली मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एअर कॉम्प्रेसरची योग्य प्रकारे निगा न राखल्याने हा स्फोट झाल्याचा  ठपका संबंधितांवर ठेवण्यात आला आहे. तसेच सुरक्षतेच्या बाबतीत कोणत्याही उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी महिला पोलिस उपनिरिक्षक पुनम जाधव यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली