शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

थीम पार्क घोटाळ्यातील ठेकेदार सत्ताधाऱ्यांच्या सोबत, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 15:20 IST

थीम पार्कच्या चौकशी समितीच्या ठरावावरील स्वाक्षरीच्या मुद्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप प्रत्यारोपांच्या झडी उडू लागल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे.

ठळक मुद्देठरावच उशिराने पाठविलाआव्हाडसुध्दा त्या ठेकेदाराला भेटले

ठाणे - घोडबंदर मार्गावर उभारण्यात आलेल्या थीम आणि बॉलीवूड पार्क प्रकल्पातील वादग्रस्त कामाची चौकशी करण्यासाठी ४८ तासात समिती नेमली जाईल, अशी घोषणा सत्ताधारी शिवसेनेने केली होती. मात्र, त्यासंदर्भातील ठराव करु न घेण्यातच सत्ताधाºयांना प्रचंड वेळ लागला आहे. केलेला ठराव शनिवारी सायंकाळी उशिरा सह्यांसाठी पाठवण्यात आल्याने त्यावर सह्या होऊ शकल्या नाहीत. त्याचा बागुलबुवा उभा करण्याचे काम शिवसेना करीत आहे. मात्र, प्रत्यक्षात या थिम पार्कच्या उभारणीतील सल्लागार तथा ठेकेदार हेच सत्ताधाºयांच्या सोबत फिरत असल्याने या चौकशीचा निव्वळ फार्सच सुरु केला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी केला आहे.                                महापालिकेमार्फत मोठा गाजावाजा करत घोडबंदर परिसरात उभारण्यात आलेल्या थीम पार्क प्रकल्पातील कंत्राटी कामाचे अक्षरश: धिंडवडे निघत आहेत. कामाचे आकडे फुगवून या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेसनेच उघडकीस आणले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचीही मागणी राष्ट्रवादीनेच सर्वप्रथम केली आहे. मात्र, या प्रकरणात आपले हात पोळले जाण्याची शक्यता असल्याने सत्ताधारीच हा ठारव तयार करण्यास वेळकाढूपणा करीत आहेत. तसेच, विरोधी पक्षनेत्यांच्या सहीअभावी हा ठराव रेंगाळला असल्याचे सांगत आहेत. मात्र, शनिवारी तयार केलेला ठराव तत्काळ पाठवणे गरजेचे असतानाही सभागृह नेत्यांनी तो सायंकाळी उशिरा पाठवला. त्यावेळी आपण कार्यालयात नसल्याने त्यावर स्वाक्षरी होऊ शकली नव्हती. आता त्याचा बाऊ केला जात आहे. मात्र, सत्ताधारी पक्षालाच या प्रकरणाची चौकशीची गरज नाही. कारण, या प्रकरणाची चौकशी झाली तर त्यामध्ये हेच लोक अडकण्याची शक्यता अधिक आहे. या पार्कचे ठेकेदार, सल्लागार हे पालकमंत्र्यांसोबत फिरत आहेत. नवरात्रोत्सवाची तयारी करताना हेच लोक पालकमंत्री आणि सभागृह नेत्यांच्या सोबत दिसले आहेत. त्यावरुन या प्रकरणाची चौकशी करण्याचा केवळ फार्स करायचा आहे, हेच दिसून येत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

ज्यांच्यावर पाटील यांनी आरोप केले आहेत, ते एक कलाकार आहेत, दरवर्षी ते नवरात्रीचा सेट उभारत आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर त्याच संदर्भात बैठक झाली आहे. उलट आ. जितेंद्र आव्हाड हे मंगळवारी त्यांना भेटले असून त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत.(नरेश म्हस्के - सभागृह नेते - ठामपा) 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस