शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सगळे कायदे खुंटीला टांगले गेले आहेत, ऋता आव्हाड यांची टीका

By जितेंद्र कालेकर | Updated: November 11, 2022 20:50 IST

पोलीस व्हॅन रोखण्याचा प्रयत्न: पोलीसांचा सौम्य लाठीहल्ला

ठाणे: सगळे कायदे हें खुंटीला टांगले गेले आहेत. जर काहींचं मिळालं नाही. तर काहीतरी शोधून काढून अटकवण्याचा प्रयत्न केला जातो. सगळं जाणीवपूर्वक केलं जातं आहे. पोलीस त्यांचे काम करीत आहेत, अशी प्रतिक्रीया राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्या तथा जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी व्यक्त केली. तर जितेंद्र आव्हाड यांनी गुन्हा केला असेल तर त्यांना नियमानुसार शिक्षा होईल. पोलीसही नियमानुसार काम करीत आहेत. त्यांच्यावर कोणत्याही स्वरुपाचा दबाव टाकलेला नसल्याचा दावा ठाण्याचे पालकमंत्री शुंभराजे देसाई यांनी केला.

आव्हाड यांना अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नी ऋता यांनी त्यांची वर्तकनगर पोलीस ठाण्यात जाऊन शुक्रवारी सायंकाळी भेट घेतली. या भेटीनंतर बाहेर आल्यावर प्रसार माध्यमांशी बोलतांना त्या म्हणाल्या की, सगळे कायदे हे खुंटीला टांगले गेले आहेत पोलीस त्यांचे काम करत आहेत. चित्रपटगृहातील कर्मचाºयांवर दबाव टाकून त्यांना जबाब दयायला सांगितले जात असल्याचा आरोपही ऋता यांनी केला. दरम्यान सायंकाळी सातच्या सुमारास डॉक्टरांचं एक पथक वर्तक नगर पोलीस ठाण्यात दाखल झालं. या डॉक्टरांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची तपासणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अटक बेकायदेशीर- अ‍ॅड. प्रशांत कदमआव्हाड यांना ज्या कलमांन्वये अटक झाली. त्यामध्ये १४१ सारखी कलमे लावली गेली. यातही अटकेच्या आधी तशी रितसर माहिती देणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांची अटक ही बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांचे वकील अ‍ॅड. प्रशांत कदम यांनी केला आहे.

आव्हाडांविरुद्ध विनयभंगाचे कलम का नाही?चित्रपटगृहामध्ये प्रेक्षक दाम्पत्यावरील हल्ल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली असली त्यांना मोकळे सोडणे समाजास घातक आहे. असे न करता आव्हाडांना साह्य करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्यास उच्च न्यायालयाकडे दाद मागावी लागेल, असा इशारा देणारी नोटीस अभिनेत्री केतकी चितळे हिचे वकील योगेश देशपांडे यांनी केला आहे. या हल्ल्याच्या वेळी तक्रारदाराच्या पत्नीवर हात टाकण्याचा प्रयत्न झाल्याने विनयभंगासंबंधीचे कलम ३५४ तसेच कटकारस्थान केल्याने १२० ब देखील लागू आहे.आव्हाडांची सुटका झाल्यास सध्या फरार असलेले साथीदार इतर चित्रपटगृहांवरही असे हल्ले करण्याचा धोका असल्याचेही अ‍ॅड. देशपांडे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे