शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

क्लस्टरच्या अंमलबजावणीवर सर्वपक्षीय सहमतीचे शिक्कामोर्तब, १ जानेवारी पासून सहा ठिकाणांचा सर्व्हे होणार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 17:47 IST

येत्या १ जानेवारी पासून क्लस्टरच्या सहा ठिकाणांचे बायोमेट्रीक सर्व्हेक्षण सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी आयुक्तांनी नगरसेवकांसमवेत एक बैठक घेतली. या बैठकीत क्लस्टरप्रती असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले.

ठळक मुद्देगावठाण कोळीवाड्यांनी पुढाकार घेतल्यास त्यांचाही समावेश करुयोजनेची पात्रता केली जाणार निश्चित

ठाणे - क्लस्टर योजनेतून गावठाण आणि कोळीवाड्यांना वगळण्यात आले असले तरी त्यांनी लेखी समंती दर्शविल्यास त्यांचाही क्लस्टरमध्ये समावेश करता येऊ शकतो अशी माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली आहे. क्लस्टर योजनेच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी नगरसेवकांनीसुध्दा आता पुढाकार घेतला आहे. तसेच ही योजना नागरिकांची फसवणूक करणारी नाही तर शहराच्या विकासाची असल्याचे मत व्यक्त करून या योजनेची माहिती देण्यासाठी आपण स्वत: नागरिकांशी संवाद साधणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.                  ठाणे महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर योजनेची माहिती देण्यासाठी आयुक्तांनी सर्वपक्षीय नगरसेवक, वास्तुविशारद आणि विकासक यांची विशेष बैठक शुक्रवारी नागरी संशोधन केंद्र येथे आयोजित केली होती. या बैठकीस सभागृह नरेश म्हस्के, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, भाजपाचे गटनेते नारायण पवार, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, क्र ीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती दिपक वेतकर, जेष्ठ नगरसेवक अशोक राऊळ, हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, सुहास देसाई याच्यासह मोठ्या संख्येने नगरसेवक-नगरसेविका आणि वास्तुविशारद उपस्थित होते. यावेळी बोलताना आयुक्तांनी शासनाच्या धोरणानुसार तसेच सर्वोच्च आणि उच्च न्यायाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून ही योजना सर्वसमावेश आणि नागरिकांच्या फायद्याची राहिल अशीच प्रशासनाची भूमिका असल्याचे सांगितले. मात्र याबाबत नागरिकांमध्ये नाहक गैरसमज पसरविण्याचे काम सुरू असून हे गैरसमज दूर करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे बोलून दाखिवले. यावेळी त्यांनी आपण स्वत:ही या योजनेची माहिती देण्यासाठी नागरिकांशी संवाद साधणार असल्याचे स्पष्ट केले.यावेळी बहुतांशी नगरसेवकांनी जुने गावठाण आणि कोळीवाडे यांचा या योजनेमधील सहभागाविषयी प्रश्न उपस्थित केले. त्यावर आयुक्तांनी सद्यस्थितीमध्ये जुने गावठाण व कोळीवाडे या योजनेतून वगळण्यात आले असले तरी संबंधितांकडून लेखी संमती मिळाली तर जुनी गावठाणे आणि कोळीवाडे या योजनेमध्ये समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेता येईल असे सांगितले. या योजनेची अंमलबजावणी करताना सीआरझेड, बफर झोन, ग्रीन झोन या सर्वांचा विचार केला असून कुठल्याही नियमाची पायमल्ली होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर ही योजना नागरिकांच्या भल्याची असून त्यांची कुठल्याही प्रकारे फसवणूक होणार नाही यासाठी प्रशासन बांधील असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.या योजनेची पात्रता निश्चित करणे, लाभार्थ्यांच्या अनुज्ञेय क्षेत्रफळाबाबत निर्णय घेणे, तसेच त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत कमीतकमी तोडफोड आणि जास्तीत जास्त पुनर्वसन करण्यावर प्रशासनाचा भर असून वन विभागाच्या जागेत राहणाºया लोकांचेही पुर्वसन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लाभार्थ्यांची पात्रता निश्चित करताना २०१४ पर्यंतचा कालावधी ग्राह्य धरण्यात येणार असून अनाधिकृत बांधकामांच्याबाबतीत मालकी हक्क प्रस्थापित होणार नसला तरी अशा इमारतींमध्ये राहणाºया नागरिकांचे ३०-३० वर्षांच्या नियमाने ९० वर्षांचे लीज करण्यात येणार असल्याने अनाधिकृत इमारतींमध्ये किंवा अनाधिकृत जागेवर उभारण्यात आलेल्या इमारतींमधील रहिवाशांनाही या योजनेमध्ये संरक्षण देण्यात आले असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी या योजनेला पाठिंबा असल्याचे जाहिर केले. सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्वपक्षीय नगरसेवक आयुक्तांच्या पाठिशी ठामपणे उभे असून या योजनेची माहिती देण्यासाठी आम्ही सर्वजण नागरिकांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले.              येत्या १ जानेवारीपासून कोपरी, हाजुरी, राबोडी, किसननगर, लोकमान्यनगर आणि टेकडी बंगला या सहा ठिकाणाच्या योजनांचे सर्वेक्षण सुरू होत असून नागरिकांनी त्याला सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी आयुक्तांनी केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त