शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आगळ्या वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन करत समस्त पुरुष वर्ग होणार वचनबद्ध, महाराष्ट्रभरात राबविणार उपक्रम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 17:04 IST

अर्थ फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने  ' पुरुषार्थ ' हा  उपक्रम ठाणे शहरासह संपूर्ण राज्यातील शाळा , महाविद्यालयात राबवण्यात येणार आहे. 

ठळक मुद्दे रक्षाबंधन करत समस्त पुरुष वर्ग होणार वचनबद्ध महाराष्ट्रभरात राबविणार उपक्रम अर्थ फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने  ' पुरुषार्थ '

ठाणेरक्षाबंधन भावा बहिणीच्या अतूट नात्याचा उत्सव. आपल्या भावाला राखी बांधते . या निमित्ताने भाऊ आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देतो .मात्र हे वचन वैयत्तिक असते . समाजात वावरताना विविध नात्यातील महिला ' पुरुषांच्या ' आयुष्यात येतात . त्यामुळे ' रक्षण ' आणि ' आदर ' केवळ बहीण आणि रक्षाबंधन पुरता मर्यादित न राहता त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक महिलेप्रती तो आदरभाव असावा यासाठी पुरुषांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी अर्थ फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने  ' पुरुषार्थ ' हा  उपक्रम ठाणे शहरासह संपूर्ण राज्यातील शाळा , महाविद्यालयात राबवण्यात येणार आहे . 

 या उपक्रमाचा शुभारंभ २७ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी ३ वाजता जोशी - बेडेकर महाविद्यालयाच्या थोरले बाजीराव सभागृह येथे होणार आहे . या उपक्रमाचा शुभारंभ ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर , ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल , आमदार संजय केळकर , आमदार निरंजन डावखरे ,सुप्रसिद्ध  चित्रपट दिग्दर्शक विजू माने यांच्या उपस्थित होणार आहे . या निमित्ताने महाविद्यालयाचे ५०० विद्यार्थी खऱ्या अर्थाने वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन करण्यासाठी सज्ज होणार आहेत . हा उपक्रम रक्षाबंधन ते भाऊबीज या कालावधीत संपूर्ण राज्यातील शाळा , महाविद्यालयात आयोजित करण्यात येणार आहे . या निमित्ताने विद्यार्थी  ' पुरुषार्थाचा 'अर्थ सांगणारी प्रतिज्ञा घेतील .. तसेच  या उपक्रमात  समाजातील विविध क्षेत्रातील प्रभावशाली पुरुष सहभागी होऊन विद्यार्थ्यांसमवेत ' पुरुषार्थाचा 'अर्थ सांगणारी प्रतिज्ञा घेणार आहेत.  उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्षा महिला मोर्चा ऍड . माधवी नाईक यांनी सांगितले ,  भविष्यात सुदृढ समाज निर्माण व्हावा तसेच महिलांनी स्वसंरक्षण कसे करावे याचे धडे दिले जातात मात्र त्यांचा इच्छांचा आदर करण्याचा संस्कार मुलांवर झाला पाहिजे तर भविष्यात समाजात घडणार्या आळा बसण्यास प्रारंभ होईल त्यासाठी रक्षाबंधन कडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा हा प्रयत्न असल्याचे नमूद केले.

टॅग्स :thaneठाणेBJPभाजपाEducationशिक्षण