कल्याण - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या पत्नी आशा गवळी यांनी दाऊद इब्राहिमला भारतात आणायला विरोध केला आहे. कल्याण येथे अखिल भारतीय सेनेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले. दाऊद इब्राहिमने अनेक निष्पाप लोकांचे बळी घेतले आहेत. त्याला इथे आणून काय करणार ? असा सवाल त्यांनी विचारला. दाऊदला भारतात आणले तर अखिल भारतीय सेना आंदोलन करेल असे त्यांनी सांगितले.
VIDEO - दाऊद इब्राहिमला भारतात आणलं तर अखिल भारतीय सेना हंगामा करेल - आशा गवळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 23:08 IST