भिवंडीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने ३० एप्रिलपर्यंत राहणार बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 07:46 PM2021-04-06T19:46:54+5:302021-04-06T19:47:03+5:30

भिवंडीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका वाढला असून नागरिकांनी शासन नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील पोलीस उपायुक्तांनी यावेळी केले आहे.

All establishments in Bhiwandi except essential services will remain closed till April 30 | भिवंडीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने ३० एप्रिलपर्यंत राहणार बंद 

भिवंडीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने ३० एप्रिलपर्यंत राहणार बंद 

googlenewsNext

भिवंडी- भिवंडीत राज्य शासनाच्या ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून मंगळवारी शहरात कडक निर्बंधांची अंमलबजावणी पोलीस यंत्रणेकडून करण्यात आली असून मंगळवार पासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व असताहपणे बंद राहणार असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपयुक्त योगेश चव्हाण यांनी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. 

भिवंडीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका वाढला असून नागरिकांनी शासन नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील पोलीस उपायुक्तांनी यावेळी केले आहे. शुक्रवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी सात वाजे पर्यंत शहरात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे यावेळी फक्त अत्यावश्यक सेवा तसेच दूध किराणा व फक्त इतर अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत.

शहरात यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून यंत्रमाग व्यवसाय सुरु राहणार आहे मात्र यंत्रमाग मालकांनी शासकीय नियमांचे काटेकोर पालन करणे जरुरीचे आहे . हॉटेल व बार पूर्णतः बंद राहणार असून फक्त पार्सल सेवा सुरु राहणार आहेत . त्याचबरोबर मनोरंजनाची ठिकाणे , खेळाची मैदाने देखील बंद राहणार आहेत . त्याचबरोबर शहरातील सलून , पार्लर देखील बंद राहणार असून शहरातील मंदिर मस्जिद व इतर सर्व धार्मिक स्थळे देखील बंद राहणार असून धार्मिक स्थळांमधील दैनंदिन पूजा पुजारी व मौलवी यांनी करण्याचे निर्देश पोलीस उपायुक्त योगेश चावाहन यांनी पत्रकार परिषदेत दिले असून सर्व निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी ३० एप्रिल पर्यंत राहणार आहेत .   

Web Title: All establishments in Bhiwandi except essential services will remain closed till April 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.