शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बारवी धरणाचे सर्व दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 03:50 IST

२५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

बदलापूर : ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाचे सर्व दरवाजे रविवारी उघडण्यात आले. धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे हे धरण सकाळी ९ वाजता भरून वाहण्यास सुरुवात झाली. धरणातील ११ दरवाजे स्वयंचलित असून, पाण्याच्या प्रवाहासोबत धरणाचे सर्व दरवाजे टप्प्याटप्प्याने उघडण्यात आले. बारवी धरणाची उंची वाढविल्यानंतर पहिल्यांदाच या धरणात पाणीसाठा निर्माण करण्यात आला. उंची वाढविल्यानंतर पहिल्याच वर्षी हे धरण भरल्याने येथे जलपूजन करण्यात आले.बारवी धरणाची उंची यंदा चार मीटरने वाढविण्यात आली होती. पूर्वी धरणाची पाण्याची पातळी ही ६८.६० मीटर एवढी होती. या जुन्या पातळीनुसार धरणात २३० एमसीएम एवढा पाणीसाठा बारवीत होत होता. यंदा या धरणाची उंची चार मीटरने वाढविली आहे. सोबतच या धरणावर स्वयंचलित दरवाजेही बसविले आहेत. त्यामुळे या धरणाची पाण्याची पातळी ७२.६० मीटर एवढी झाली आहे. प्रथमच हे धरण वाढीव उंचीनुसार भरण्यास सुरुवात करण्यात आली. धरणात ३४० एमसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. धरणावर बसविलेल्या ११ स्वयंचलित दरवाजांपैकी गेट नंबर ४ सकाळी ९ वाजता उघडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर, दोन तासांतच धरणाचे सर्व दरवाजे उघडले. धरण क्षेत्रात पाऊस जास्त झाल्याने, धरणातून २५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.बारवी धरण भरल्याने धरणातून होणाºया पाण्याचा विसर्ग हा मोठा आहे. त्यामुळे हे सर्व पाणी बारवी नदीमार्गातून उल्हास नदीला मिळणार आहे. त्यामुळे उल्हास नदी आणि बारवी नदी ज्या भागात मिळते, त्याच्यापुढे असलेल्या कल्याण ग्रामीण भागाला सर्वात मोठा फटका सहन करावा लागणार आहे.

टॅग्स :Damधरण