शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

टिएमटीच्या सावळ्या गोंधळला आता पालिका घालणार लगाम, संगणकाने जोडले जाणार सर्व विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 16:19 IST

परिवहनच्या बेफान कारभाराला लगाम घालण्यासाठी, ठाणे महापालिकेने आता पावले उचलली आहेत. त्यानुसार आता ई. आर. पी. या संगणक प्रणालीचा आधार घेतला जाणार आहे. त्यामाध्यमातून परिवहनचा कारभार सुधारण्याचा पालिकेचा मानस आहे.

ठळक मुद्देपरिवहनच्या कर्मचाऱ्यांसह विविध विभागांना लागणार शिस्तकमांड सेंटर देखील उभारले जाणारसर्व विभाग संगणकाद्वारे जोडले जाणार

ठाणे - ठाणे परिवहन सेवेतील सावळ्या गोंधळाला लगाम घालण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. त्यानुसार परिवहनची कार्यशाळा, बसेस दुरुस्तीसाठी आलेले पार्ट्स आणि एकूणच कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी ठाणे महापालिका ई. आर. पी. (इंटरप्रायजेस रिर्सोस प्लॅनींग) ही संगणक प्रणालीचा वापर करणार आहे. या माध्यमातून सर्व यंत्रणांना संगणाद्वारे जोडण्यात येणार असून प्रत्येक विभागातील प्रत्येक मिनिटा मिनिटांच्या घडामोडी यामाध्यमाूतन टिपल्या जाणार आहेत. शिवाय यासाठी एक कमांड सेंटर देखील कार्यान्वित केले जाणार असून या माध्यमातून प्रत्येकावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. यासाठी ८ कोटी ५० लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.ठाणे परिवहन सेवेत आजच्या घडीला ३५० हून अधिक बसेस आहेत. परंतु जीसीसी वगळता परिवहनच्या स्वत:च्या केवळ ९० च्या आसपासच बसेस रस्त्यावर धावत आहेत. सध्या परिवहनच्या २७० च्या आसपास बसेस रस्त्यावर धावत आहेत. जीसीसी कंत्राटदारामुळे परिवहन सेवेला काहीसा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी मागील कित्येक वर्षापासून कार्यशाळेची सुरु असलेली बोंब, किती साहित्य आले कीती वापरले गेले, टायर किती आले, स्पेअरपार्ट्स किती आले, कोणता कर्मचारी कामावर आला कोणता गेला, बस वेळेवर धावत का नाही, बसेस दुरुस्तीसाठी केव्हा पासून आगारात उभ्या आहेत, किती वेळेत त्या दुरुस्त होणे अपेक्षित आहेत. यासंह येथील कर्मचाऱ्यांवर देखील कोणत्याही प्रकारे अंकुश ठेवण्यात येत नव्हता. याच मुद्यावरुन कित्येक वेळेला परिवहन समित्याच्या बैठकीतही कार्यशाळा आणि एकूणच परिवहनच्या या कार्यप्रणालीचे वाभाडे काढण्यात आले आहेत. परिवहनच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी, किती सामान आले, किती वापरले गेले आहे, याची माहिती उपलब्ध व्हावी, किंबहुना त्यांचे रेकॉर्ड उपलब्ध व्हावेत अशी मागणी कित्येक वेळेला लावून धरण्यात आली आहे.दरम्यान, त्यानुसार मागील दोन वर्षापासून परिवहनला शिस्त लावण्यासाठी पालिकेकडून या प्रणालीचा वापर करण्याचा विचार सुरु होता. परंतु, निधी अभावी हे काम पालिकेला करता येत नव्हते. अखेर आता दोन वर्षानंतर पालिकेने परिवहनच्या कारभाराला अकुंश लावण्यासाठी ई. आर. पी. प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी या प्रणालीचा यशस्वी वापर नवी मुंबई परिवहन सेवेने केला आहे. त्यानंतर आता ठाणे परिवहन सेवेतही या प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्यानुसार परिवहनचा सर्व कारभार आता संगणीकृत करण्यात येणार असून काय आले काय गेले, कोणते साहित्य वापरले गेले, बसेसची वेळेत दुरुस्ती झाली का, कर्मचारी किती वाजता आला किती वाजता गेला, यासह सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यामुळे परिवहनच्या सावळ्या गोंधळाच्या कारभाराला अंकुश बसणार असून परिवहन सेवा सुरळीत सुरु होण्यास मदत होणार असल्याचे मत परिवहनचे प्रभारी व्यवस्थापक संदीप माळवी यांनी व्यक्त केले. तसेच कमांड सेंटर देखील उभारण्यात येणार असल्याने त्यामाध्यमातून सर्व डेटा सेव्ह केला जाणार आहे. या कामासाठी खाजगी संस्थेची मदत घेतली जाणार असून, पुढील पाच वर्षासाठी हे काम संबधींत संस्थेला दिले जाणार आहे. डेटा सेंटरच्या ठिकाणी त्या संस्थेचे कर्मचारी आणि टिएमटीचे देखील काही कर्मचारी काम करणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त