शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी पार्किंगमध्ये दारू पार्ट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 00:39 IST

‘ब’ प्रभाग क्षेत्रातील प्रकार : कचरा गाड्यांऐवजी दुचाकी, रिक्षा राहत आहेत उभ्या

कल्याण : पश्चिमेतील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘ब’ प्रभाग क्षेत्रातील पार्किंगची जागा महापालिकेने कचरा गाड्यांसाठी दिली आहे. मात्र, तेथे या गाड्यांऐवजी रिक्षा व दुचाकी बेकायदा उभ्या केल्या जात आहेत. या पार्किंगमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्याने दारूच्या पार्ट्या झोडल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी बुधवारी या पार्किंगची अचानक पाहणी केली. यावेळी हा प्रकार उघडकीस आला. हे पार्किंग खडकपाडा पोलीस ठाण्यासमोरच आहे. एका बिल्डरला दिलेल्या इमारत परवानगीत ही पार्किंगची जागा महापालिकेस सर्वसमावेशक आरक्षणात विकसित करून देण्यात आली.

महापालिकेने चार प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे कंत्राट आर अ‍ॅण्ड डी या कंपनीला दिले आहे. महापालिकेने पार्किंगची जागा या कंपनीला त्यांच्या कचरा गाड्या उभ्या करण्यासाठी दिली आहे. मात्र, तेथे कचरा गाड्या कमी आणि खाजगी दुचाकी व रिक्षाचालक त्यांच्या गाड्या तेथे उभ्या करत असल्याचे पाहणीच्या वेळी आढळून आले. त्याचबरोबर तेथे दारूच्या बाटल्या पडलेल्या आढळल्या. त्यामुळे रात्रीच्या वेळी तेथे दारूच्या पार्ट्या झोडल्या जात असल्याचे यावरून उघड झाले आहे.

पार्किंगचा गैरवापर करणाऱ्या रिक्षा व दुचाकी चालकांकडून हा प्रकार सुरू आहे की, कचरा गाड्यांवर काम करणारे चालक, वाहक आणि कामगार ओल्या पार्ट्या करून गाडीवर काम करीत आहते, असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी कचरा गाड्यांवर नगरसेवकांनी छापा टाकली होती. त्यावेळी अनेक चालकांनी गणवेश घातलेला नव्हता. तसेच त्यांच्या हातात सुरक्षिततेची साधने नव्हते. त्यामुळे गाडीवरचा चालक आहे की रस्त्यावरचा कोणी टपोरी, असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्याच कामगार दारू पार्ट्या झोडून कचरा उचलण्याचे काम करत असतील, तर ही बाब गंबीर आहे. अशा प्रकारांमुळे महापालिका प्रशासनाची बदनामी होत आहे. शिवाय मद्यपान करून गाडी चालविल्याने रस्त्यावर एखादा अपघात होऊन पादचारी, प्रवासी, तसेच गाडीवरील कामगारांचा नशेमुळे जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, विश्वनाथ राणे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अमित पंडित यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार त्यांच्या कानावर घातला आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणीही राणे यांनी प्रशासनाकडे केली आहे.यासंदर्भात पंडित यांना विचारले असता ते म्हणाले, याप्रकरणी सविस्तर अहवाल मागविला आहे. दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल.कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही. पार्किंगच्या जागेचा गैरवापर होत असेल तर गैरवापर करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका