शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात

By जितेंद्र कालेकर | Updated: September 24, 2024 20:55 IST

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय हा पाेलिसांच्या चकमकीत मारला गेल्यानंतर त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयात उतरीय तपासणीसाठी नेण्यात आला हाेता.

ठाणे: ठाणे पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या अक्षय शिंदे याचा मृतदेह त्याचे नातेवाईक अखेर बुधवारी ताब्यात घेणार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या शवागरात त्याचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी ठेवण्यात आला. त्याच दरम्यान मुंब्रा पोलिसांनी संपर्क साधल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी ही माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, नियतीने बदलापूर अत्याचार प्रकरणातील पिडित चिमुरडींना न्याय दिला, अशी भावना व्यक्त करीत धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीला ठाण्याचे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्यासह शिवसैनिकांनी मंगळवारी आदरांजली वाहिली.

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय हा पाेलिसांच्या चकमकीत मारला गेल्यानंतर त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयात उतरीय तपासणीसाठी नेण्यात आला हाेता. शवविच्छेदनानंतर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह पुन्हा कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणण्यात आला. परंतू, अक्षय याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्याचे काेणीही नातेवाईक रात्री आलेले नव्हते. त्यामुळे मुंब्रा पोलिसांनी त्याचे वडिल अण्णा शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी बुधवारी आपण त्याचा मृतदेह ताब्यात घेणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली.

दरम्यान, ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. या जिल्ह्यात महिलांवर वाकडी नजर करणाऱ्यांना दिघे ज्या पद्धतीने धडा शिकवत होते, आज नियतीने बदलापूर अत्याचार प्रकरणातील पिडित चिमुरडींना न्याय दिला. दिघे यांचे शिष्य राज्याचे मुख्यमंत्री आहेत. समाजातील सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. बदलापूर प्रकरणातील नराधमाचा पोलीसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. याबाबत ठाण्यातील शिवसैनिकांनी खासदार म्हस्के यांच्या नेतृत्वात जल्लोष केला. यावेळी शिवसैनिकांनी दिघे यांच्या ठाण्यातील समाधीस्थळी जाऊन पुष्पांजली वाहिली. यावेळी शिवसैनिकांनी पोलिसांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

टॅग्स :badlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारी