शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गायनाचार्य पं ए के अभ्यंकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 12:58 IST

गायनाचार्य पं. अच्युत केशव अभ्यंकर उर्फ पं. ए के अभ्यंकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने सोमवार (9 एप्रिल) निधन झाले.

ठाणे : गायनाचार्य पं. अच्युत केशव अभ्यंकर उर्फ पं. ए के अभ्यंकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने सोमवार (9 एप्रिल) निधन झाले. गेली अनेक वर्षे ठाणे (पूर्व) येथे वास्तव्यास असलेल्या पं. अभ्यंकर यांचे रात्री 8 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. किराणा घराण्यातील पं फिरोज दस्तूर यांचे जेष्ठ शिष्य असलेल्या पं अभ्यंकरांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. 1964 साली ठाण्यात स्थायिक झालेले पं अभ्यंकर हे त्यांच्या गायकीसाठी देश-परदेशात प्रसिद्ध होते. ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनचे नामवंत गायक असलेले पं अभ्यंकर हे गायनाच्या प्रचार आणि प्रसारासाठी 1992 ते 1995 सालापर्यंत मुंबई विद्यापीठात हिंदुस्थानी संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते.

पं अभ्यंकर यांच्या तालमीत ठाण्यातील अनेक नावाजलेले गायक आणि गायिका गायकीचे धडे घेतले. डॉ वरदा गोडबोले, लीला शेलार, विभावरी बांधवकर, मधुवंती दांडेकर, प्रणव पटवर्धन हे यापैकी काही. पं. अभ्यंकर हे ठाणे पूर्व इथल्या संस्कार भारती, शृंगार संगीत, स्वरदायिनी ट्रस्ट, नादसारिता, संगीत संकल्प, चिंतामणी संगीत सभा आदी संस्थांचे अध्यक्ष अथवा महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. पं अभ्यंकर याना सुरमणी, गायनाचार्य, संगीत ऋषी या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ठाणे महापालिकेतर्फे 2006 साली ठाणे गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.