शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात राष्ट्रवादीच्या गंगोत्री गटाचा ढोलताशे वाजवून फटाक्याची अतिषबाजी, अजित पवार जिंदाबादच्या घोषणा

By सदानंद नाईक | Updated: July 2, 2023 19:17 IST

फटाक्याच्या आतिषबाजी वेळी गंगोत्रीसह पक्षाचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सदानंद नाईक उल्हासनगर : शहर राष्ट्रवादीच्या गंगोत्री गटाने अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच मध्यवर्ती कार्यालया समोर ढोलताशे वाजवून व फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला. दुसरीकडे कलानी महल मध्ये शुकशुकाट असून माजी आमदार पप्पु कलानी, शहरजिल्हाध्ययक्ष पंचम कलानी व युवानेते ओमी कलानी यांच्या सोबत संपर्क केला असता, मोबाईल बंद होता. 

उल्हासनगरात राष्ट्रवादी पक्षात कलानी व गंगोत्री गट आहेत. त्यापैकी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदी पंचम कलानी असून कलानी कुटुंब हे कट्टर शहर पवार समर्थक आहेत. तर गंगोत्री गट अजित पवार यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. रविवारी दुपारी अजित पवार यांच्यासह अन्य राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी मंत्री पदाची शपथविधी झाल्यानंतर, पक्षाचे भारत गंगोत्री यांच्या गटाने कॅम्प नं-५ येथील मध्यवर्ती कार्यालया समोर ढोलताशे वाजवून फटाक्यांची आतिषबाजी केली. तसेच एकमेकाला पेढे भरून अजित पवार यांच्या जिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया भारत गंगोत्री, माजी शहरजिल्हाध्यक्ष सोनिया कौर धामी, माजी नगरसेविका सुनीता बगाडे, विशाल माखिजा, विकास खरात, माधव बगाडे आदींनी दिली. फटाक्याच्या आतिषबाजी वेळी गंगोत्रीसह पक्षाचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादी पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्षा पंचम कलानी, माजी आमदार पप्पु कलानी, युवानेते ओमी कलानी, पक्ष प्रवक्ते कमलेश निकम आदीचे मोबाईल बंद असून कलानी महल मध्ये शुकशुकाट आहे. कलानी कुटुंब राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक असून ते अजित पवार यांच्या सोबत जाणार नसल्याचे बोलले जात आहे. मात्र माजी आमदार यांना जेल बाहेर राहण्यासाठी अजित पवार यांच्या सोबत जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांच्या भाजप आघाडीत जाण्याने शहर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारulhasnagarउल्हासनगर