शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 07:24 IST

एका रात्रीत पालटले सत्तेचे समीकरण, संख्याबळ ३२ वर पोहोचले. आता उपनगराध्यक्ष, विषय समित्या शिंदेसेनेकडेच राहतील. 

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या नवनिर्वाचित १२ नगरसेवकांना हाताशी धरून शिंदेसेनेला बाजूला ठेवून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपला शिंदेसेनेने प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या चार नगरसेवकांना सोबत घेत शिंदेसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला. ५९ नगरसेवकांच्या या नगरपालिकेत शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) यांचे संख्याबळ आता ३२ झाले. आनंद आश्रम येथे दाेन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. 

आधी काय घडले?

नगरपालिकेत शिंदेसेनेचे सर्वाधिक २७ नगरसेवक निवडून आले होते. एका अपक्षाच्या साथीने त्यांचे संख्याबळ २८ वर पोहचले होते.  सत्तास्थापनेसाठी त्यांना दोन नगरसेवकांची आवश्यकता असताना, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपला साथ दिली होती. नैसर्गिक युती डावलून भाजपने काँग्रेससोबत युती केल्याचा दावा शिंदेसेनेकडून करण्यात आला होता.

सत्ता स्थापनेत मोठा ट्विस्ट 

गुरुवारपर्यंत भाजपसोबत असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार)च्या चार नगरसेवकांनी शुक्रवारी शिंदेसेनेला समर्थन दिले. त्यामुळे शिंदेसेनेचे संख्याबळ ३२ वर पोहोचले. काँग्रेसमधून निलंबित १२ नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केल्याने भाजपचे संख्याबळ ३१ वर पोहोचले. आता उपनगराध्यक्ष, विषय समित्या शिंदेसेनेकडेच राहतील. 

भाजपने घात केला

निवडणुकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वतः फोन करून तुम्ही उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव सुचवा, तसे आश्वासन दिले. त्यानुसार तयारी केली. परंतु, गाफील ठेवून त्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना सोबत घेऊन आमचा घात केला. - डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Sena Thwarts BJP's Power Play in Ambernath with Pawar's Support

Web Summary : In Ambernath, Shinde Sena, backed by Ajit Pawar's NCP, countered BJP's attempt to form a coalition with Congress. Shinde Sena now holds a majority with 32 members, preventing BJP from gaining control of key municipal committees.
टॅग्स :ambernathअंबरनाथLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Mahayutiमहायुती