शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

अजय-अतुल यांच्या गाण्यांनी ठाणेकर सैराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 01:51 IST

मराठी चित्रपट संगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या अजय-अतुल या संगीतकार जोडीचा लाइव्ह कॉन्सर्ट ऐकण्याची ठाणेकरांना पर्वणीच ठरली.

ठाणे : मराठी चित्रपट संगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या अजय-अतुल या संगीतकार जोडीचा लाइव्ह कॉन्सर्ट ऐकण्याची ठाणेकरांना पर्वणीच ठरली. आई भवानी, नदीच्या पल्याड, लख्ख पडला प्रकाश अशा गाण्यांनी त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध तर केलेच, परंतु यावेळी सादर झालेल्या सैराटच्या गाण्यांवर प्रेक्षकांना थिरकायलादेखील लावले.रविवारी ठाणे-कळव्यातील रसिकांसाठी ‘अजय-अतुल लाइव्ह’ या कार्यक्र माचे मंदार केणी यांनी आयोजन केले होते. सैराट चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाले, त्यानिमित्ताने त्यांच्या चाहत्यांसाठी खास संगीताची मेजवानी उपलब्ध करून दिली. ‘नटरंग’ या नमनाने अजय-अतुल यांच्या संगीत मैफलीला सुरु वात झाली. त्यानंतर, देवीला वंदन करत ‘दुर्गे दुर्घट भारी’ हे लोकप्रिय गाणे त्यांनी सादर केले. ‘नवरी आली’, ‘वाट दिसू दे रे देवा’, ‘अभी मुझ मे कही’ अशी भावनिक गाणी, ‘अप्सरा आली’, ‘वाजले की बारा’ यासारख्या अत्यंत गाजलेल्या गाण्यांवर रसिकांना ताल धरायला भाग पाडले. यावेळी सैराट या चित्रपटातील आॅर्केस्ट्राशिवाय गायलेल्या गाण्यांवर रसिकांनी तेवढेच प्रेम केले. त्याचबरोबर रसिकांनी कधीही न पाहिलेल्या, ऐकलेल्या काही गाण्यांची कडवीही त्यांनी गायली.या दोन तासांच्या संगीत मैफलीमध्ये अजय-अतुल यांच्या कारकिर्दीतील अजरामर अशी २०-२५ गाणी सादर झाली. या लोकप्रिय जोडीला साथ देण्यासाठी यावेळी इंडियन आयडॉलफेम अभिजित सावंत, तरु ण गायक दिव्यकुमार, गायिका योगिता गोडबोले-पाठक, प्रियंका बर्वे ही मंडळी उपस्थित होती. मराठी रसिक इतके सुजाण आहेत की, आमच्या प्रत्येक गाण्याची सुरु वात झाली की, त्यांना कळते, असे सांगत अगदी प्रामाणिकपणे आपली गाण्यावरची श्रद्धा अजय यांनी रसिकांसमोर मांडली. तसेच आपले वादक हे आपल्या कार्यप्रेमाचे प्राण असतात, त्यामुळे त्यांना आम्ही आमचे कुटुंब मानतो, अशी ग्वाही त्यांनी दिली.