शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन सुरू झाली आगरी शाला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 15:59 IST

उन्हाळ््याच्या सुट्टीत भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात आगरी बोली भाषा शिकविणारी आगरी शाला सुरू झाली आहे. ही भाषा शिकण्यासाठी दहा दिवसांच्या आगरी बोलीचे प्रशिक्षणवर्ग घेतले जात आहे.

ठळक मुद्देसुरू झाली आगरी बोली भाषा शिकविणारी आगरी शाला भाषाप्रेमींनी गिरवले आगरी भाषेचे धडे आगरी अन बिगर आगरी प्रशिक्षणार्थींचाही सहभाग

ठाणे: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आगरी शाला ठाण्यात सुरू झाली आहे. यात पहिल्या दिवशी आलेल्या भाषाप्रेमींनी आगरी भाषेचे धडे गिरवले. यात आगरी भाषेतील बाराखडीपासून प्रत्येक शब्दांचा उच्चार कसा करावा याचे प्रशिक्षण या शालेतल्या प्रशिक्षणार्थींनी घेतले. केवळ ठाणे नव्हेच तर पुणे, अलिबाग, मुंबई, ठाणे, बाळकुम, भिवंडी अशा विविध भागांतील आगरी अन बिगर आगरी प्रशिक्षणार्थींचाही सहभाग होता.            आगरात-मीठागरात काम करणारे आगरी आणि त्यांची बोलीभाषाही आगरी. परंतू काळानुरूप या भाषेचे विविध पैलू जसे की कमी शब्दात व्यक्त होणे, एकाच शब्दाचे अनेक अर्थ असणे, सहज समजणे नवी पिढीपासून लुप्त वा दूर चालले आहेत. आगरी भाषेचे विविध अंग कळावे त्यातील साहित्याची गोडी कळावी या अनुषंगाने युवा साहित्यिक सर्वेश तरे यांनी ‘आगरी शाला’ हा बोली भाषा संवर्धनार्थ नविन प्रयोग सुरू केला. या आगरी शालेच्या पहिल्या वर्गाला पंधरा प्रशिक्षणार्थांनी सहभाग नोंदवला. यात आगरी अन बिगर आगरी प्रशिक्षणार्थींचाही सहभाग होता. या आगरी शालेच्या पहिल्या वर्गात गजानन पाटील, प्रकाश पाटील, मोरेश्वर पाटील आणि सर्वेश तरे यांनी मार्गदर्शन केले. प्रकाश पाटील यांनी आगरी लुप्त होत चालेलेल्या काही शब्दांची आठवण करून दिली. मोरेश्वर पाटील यांनी ही भाषा फक्त समाजापुर्ती मर्यादित नसून तीची व्याप्ती विशाल आणि सर्व समावेशक आहे हे समजवून दिले. गजानन पाटील यांनी आगरी बोलीचा व्यवहारात कसा वापर करता येऊ शकतो हे समजवून सांगीतले. सर्वेश तरे यांनी आगरी बोली जर एका दिवसात शिकायची झाल्या सोप्पे नियम सांगत ‘ळ’ या अक्षरा ऐवजी ‘ल’ , ‘ण’ या अक्षरा ऐवजी ‘न’ , ‘ड’ या अक्षरा ऐवजी ‘र’ असा शब्द प्रयोग करण्याचा प्रयत्न केला की आगरी भाषा तुम्हाला सहज बोलता येऊ शकेल असे सांगीतले. या शाळेचे पुढील वर्ग शनिवार-रविवार भरणार असून एकाच दिवशी दोन सत्रांचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. पुढील ‘आगरी शालेचे वर्ग’ ५-६ मे, १२-१३ मे तसेच १९-२० मे रोजी कशेळी येथील शाळेत ४ ते ६ या वेळेत भरणार आहे. या वर्गासाठी प्रा. सदानंद पाटील, प्रा. एल.बी पाटील, डॉ. अनिल रत्नाकर, दया नाईक, प्रकाश पाटील, मोरेश्वर पाटील, गजानन पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या आगरी शालेत अजूनही कुणाला सहभाग घ्यायचा असेल तर ९०९६७२०९९९ यावर संपर्क साधण्याचे कवी सर्वेश तरे यांनी आवाहन केले असून हे प्रशिक्षण शिबीर मोफत असणार आहे.-------------------------------------------फोटो : आगरी बोली

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकSchoolशाळा