शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत अग्नितांडाव सुरूच; आमने येथील दोन कंपन्यांना भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन यंत्रणा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 14:19 IST

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

- नितिन पंडीत

भिवंडी: भिवंडीतआगिंचे सत्र सुरूच असून मंगळवारी सात भंगार गोदामांना लागलेली आग विझते न विझते तोच आमने गावात असलेल्या गोदाम संकुलनातील दोन कंपन्यांना बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

तालुक्यातील आमने गावच्या हद्दीत असलेल्या महावीर गोदाम संकुलनात व्हीआरआयपीएल रिटेल कंपनी व  ऑर्बीट एक्स्पोर्ट कंपनी या दोन गोदाम कंपन्यांना पहाटे भीषण आग लागली असल्याने लागलेल्या आगीत दोन्ही कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. या गोदाम कंपन्यांमध्ये प्लास्टिक ,कासमैटीक , घरगुती साहित्य , हार्डवेअर तसेच कापडाचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आला होता.

बुधवारी पहाटेच्या सुमारास या दोन्ही गोदामांना भीषण आग लागल्याने दोन्ही गोदामे जळून खाक झाली आहेत. या आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी, कल्याण ,ठाणे येथील तीन गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

दरम्यान मार्च महिना आला की भिवंडीत गोदाम व यंत्रमाग तसेच डाइंग सायजिंग कंपन्यांना आग लागण्याचे सत्र सुरू होत असल्याने या आगिंमागील नेमकी कारण समजत नाही. त्यामुळे या आगी अचानक लागतात की इन्शुरन्स मिळविण्यासाठी लावल्या जातात याबाबतचे सत्य समोर येतांना दिसत नाही. त्यामुळे या आगिंच्या घटनांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीfireआगthaneठाणे