शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर पडलेले खड्डे व दुभाजकाविरोधात; ठामपा मुख्यालयासमोर काॅग्रेसचे आंदोलन

By अजित मांडके | Updated: July 31, 2023 14:40 IST

ठाणे शहर काॅग्रेसच्या वतीने ठामपा मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन केले.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : पावसाळ्यात ठाणे महानगर पालिका हद्दीतील जागोजागी पडलेले खड्डे व विविध रस्त्यांवर लावण्यात आलेले अनावश्यक दुभाजक याच्या विरोधात ठाणे शहर काॅग्रेसच्या वतीने ठामपा मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन केले.

पावसाळा सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच ठाण्यातील विविध महत्वाच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे व यामुळेच होत असलेली वाहतूक कोंडी यामुळे ठाण्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून या विरोधात काॅग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ठामपा मुख्यालयासमोर शहराध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण याच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करून आपला संताप व्यक्त केला.  या प्रसंगी प्रदेश सचिव व ठाणे प्रभारी संतोष किणे,काॅग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे,सेवादल अध्यक्ष शेखर पाटील,महिला अध्यक्षा वैशाली भोसले,प्रदेश सदस्य जे.बी.यादव,शकीला शेख,महेद्र म्हात्रे,निशिकांत कोळी,रमेश ईदिसे,प्रवक्ते राहुल पिंगळे,रविंद्र कोळी,मंजूर खत्री,स्वप्नील कोळी,शिरीष घरत,चंद्रकांत मोहीते,प्रकाश मांडवकर आदीसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना विक्रांत चव्हाण यांनी सागितले की,पावसाळ्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांसह ठाण्यातील रस्त्यावरील खड्ड्याबाबत पाहणी दौरा झाला होता. मोठ्या प्रमाणात फोटोसेशन करण्यात आले होते, जागोजागी खड्डेमुक्त ठाणे अशा प्रकारचे फलक लावण्यात आले होते. परंतु पहिल्याच पावसात रस्त्यांवरील खड्ड्याबाबत खरे चित्र समोर आले आहे.  ठाण्यातील प्रत्येक रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. जिथे जिथे वर्षानुवर्ष पावसाळ्यात पाणी तुंबत होते, तिथे आजही तिच अवस्था आहे. कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता कामे करण्यात आल्यामुळे हि परिस्थिती ओढवली आहे,मुख्यमंत्र्यांना चुकीची माहीती देण्यात येते मुख्यमंत्र्यानी स्वतःच्या वागळे इस्टेट परिसरातील रस्त्यांची पाहणी केली तरी त्याना खरी परिस्थिती लक्षात येईल. ठामपा प्रशासन म्हणते की सर्व चांगले आहे तर आयुक्तांनीच माझ्याबरोबर फिरावे मी त्यांना ठीकठीकानी नेऊन परिस्थिती दाखवेल रस्त्यांच्या कामात १६ टक्के कमिशन घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी याप्रसंगी केला मग दर्जा कसा मिळणार? असा सवालही विक्रांत चव्हाण यानी केला.अनावश्यक ठीकाणी लावण्यात आलेल्या दुभाजकामुळे वाहतूक कोंडी वाढत चालली आहे असेही चव्हाण यानी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेस