शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात भाजप नगरसेवकाविरुद्ध दुसऱ्यांदा विनयभंगाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 01:28 IST

या घटनेतील पीडित महिला बारमध्ये गायिका आहे. कांबळे यांनी तिला लग्नाचे

ठाणे : शहरातील इंदिरानगर भागातील ठाणे महापालिकेचे भाजप पुरस्कृत नगरसेवक विलास कांबळे याच्याविरुद्ध दोन महिन्यांपूर्वी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. यातील पीडित महिलेने पुन्हा त्याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात आता विनयभंगासह धमकीचा गुन्हा सोमवारी दाखल केला.

या घटनेतील पीडित महिला बारमध्ये गायिका आहे. कांबळे यांनी तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करून कांबळेसह त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध १ सप्टेंबर २०१९ रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, या घटनेतील पीडित महिला २३ डिसेंबरला आपल्या बहिणीसह या गुन्ह्यासंदर्भातील न्यायालयीन कामासाठी ठाणे न्यायालय परिसरात आली होती. त्यावेळी कांबळे याने पीडित महिलेकडे पाहून अश्लील वर्तन केले. याचा जाब विचारण्यास तिची बहीण गेली असता कांबळे यांनी तिला ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तिने आणि बहिणीने ठाणेनगर पोलीस ठाण्यात कांबळेविरुद्ध विनयभंग आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे ठाणे नगर पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी