शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

समाज कल्याण विभाग : दोन वर्षांनंतर निधी मिळताच 280 लाभार्थ्यांना झाला लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 00:42 IST

Thane News : जातीयवादाची दरी कमी करण्यासाठी राज्य शासनाने ऑगस्ट, २००४ मध्ये आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना सुरू केली. या योजनेत देण्यात येणाऱ्या रकमेपैकी अर्धी रक्कम विवाहितांच्या नावाने अल्पबचतीत गुंतविण्यात येत होती, तर उर्वरित रकमेचे संसारोपयोगी साहित्य दिले जात होते.

 ठाणे : आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी समाजकल्याण विभागाच्यावतीने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांंना प्रोत्साहन अनुदान देण्याच्या योजनेतील केंद्र सरकारच्या हिश्शाची अनुदानाची रक्कम गेली दोन वर्षे प्राप्त न झाल्याने लाभार्थ्यांना वंचित राहावे लागले होते. मात्र, मागील महिन्यात केंद्र शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्याने सप्टेंबर, २०१९ पर्यंतच्या २८० लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम देण्यात आला असल्याची माहिती समाज कल्याण विभागाने दिली.जातीयवादाची दरी कमी करण्यासाठी राज्य शासनाने ऑगस्ट, २००४ मध्ये आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना सुरू केली. या योजनेत देण्यात येणाऱ्या रकमेपैकी अर्धी रक्कम विवाहितांच्या नावाने अल्पबचतीत गुंतविण्यात येत होती, तर उर्वरित रकमेचे संसारोपयोगी साहित्य दिले जात होते. वाढती महागाई आणि बदलत्या काळानुसार १५ हजार रुपयांची अनुदानाची रक्कम अत्यंत कमी असल्याने, यामध्ये वाढ करून ५० हजार करण्यात आली आहे. आंतरजातीय विवाह योजना ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. २०१५-२०१६ या कालवधीत आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत तब्बल १९२ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी १९० लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये २१ लाभार्थ्यांना १५ हजार रुपयाप्रमाणे, तर १६९ लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांप्रमाणे अनुदानाचे वाटप करण्यात आले होते. २०१६-२०१७ या कालवधीत विवाह योजनेंतर्गत प्राप्त १३७ प्रस्तावांना अनुदानाचे वाटप करण्यात आले. २०१७-२०१८ या कालवधीत २११ प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी २०५ लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांप्रमाणे, तर सहा लाभार्थ्यांना १५ हजार रुपयांप्रमाणे अनुदानाचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :marriageलग्नthaneठाणे