शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हत्येनंतर मनोज रोज तिचे तुकडे करीत होता; आरोपीला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी 

By जितेंद्र कालेकर | Updated: June 8, 2023 18:42 IST

बोरीवलीमध्ये शीधा वाटप केंद्राचे दुकान सांभाळणाऱ्या मनोजची सरस्वतीबरोबर २०१४ मध्ये ओळख झाली.

ठाणे: गेल्या दहा वर्षांपासून सरस्वती वैद्य (३२) हिच्या बरोबर एकत्रित राहणार्या मनोज साहनी (५६) याने  तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. त्याहूनही कहर म्हणजे हत्येनंतर सलग चार दिवस तो तिच्या शरीराचे तुकडे करीत होता, अशी माहिती नयानगर पोलिसांनी ठाणे न्यायालयात दिली. अशा क्रूरकर्म्याला जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी केल्यानंतर ठाणे न्यायालयाने १६ जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश गुरुवारी दिले आहेत.

बोरीवलीमध्ये शीधा वाटप केंद्राचे दुकान सांभाळणाऱ्या मनोजची सरस्वतीबरोबर २०१४ मध्ये ओळख झाली. याच ओळखीतून ते एकमेकांच्या प्रेमात पडले. तिला आई वडिल कोणीच नाही. तर त्यालाही आई वडिल नाहीत. त्याच्या रेशनिंग दुकानावर येण्यामुळेच त्यांच्यातील संबंध वाढत गेली. दहा वर्षांपासून ते एकत्र वास्तव्याला असले तरी त्यांचे लग्न झालेले नव्हते. त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून भांडणे होतच होती. याच भांडणातून त्याने तिची ४ जून ला हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तो तिचे रोजच तुकडे करीत होता. आता त्याने यातील काही तुकडयांची कुठे विल्हेवाट केली आहे? हत्येमागे नेमकी कोणते कारण घडले? त्याच्या  भार्इंदर पूर्व भागातील गीता आकाशदीप इमारतीमधील घरात एक वूड कटरही पोलिसांना मिळाले आहे. पण, हत्या करण्यासाठी मनोजने नेमकी कशाचा वापर केला? यात त्याचे आणखी कोणी साीदार आहेत का? या सर्वच  बाबींचा सखोल तपास करण्यासाठी नयानगर पोलिसांनी कीत आरोपी मनोजला १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी दीवाणी न्यायाधीश एम. डी. ननावरे यांच्याकडे केली. न्यायालयाने सर्व बाजू पडताळल्यानंतर आरोपीला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अत्यंत संवेदनशील प्रकरण असल्यामुळे नयानगर पोलिसांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी