शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तानसा, मोडकसागरनंतर भातसाही भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 04:55 IST

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७६.९७ टक्के पाऊस झाला आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७६.९७ टक्के पाऊस झाला आहे. याचदरम्यान, धरण क्षेत्रातही पाऊस चांगला झाल्याने पुरेसा पाणीसाठा झाला असून, तानसा, मोडकसागरनंतर भातसा वाहू लागले आहे. समाधानकारक पावसामुळे मुंबईकरांपाठोपाठ ठाणेकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.बुधवारीही पावसाचा लपंडाव सुरू होता. सकाळी ८ वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्यात सरासरी ३१.०४ मिमी पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक ६० मिमी पाऊस शहापुरात नोंदविला आहे. त्याचपाठोपाठ मुरबाड ३७, ठाणे ३५, कल्याण ३१, अंबरनाथ २४.३० आणि उल्हासनगर-भिवंडीत प्रत्येकी १५ मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत (१ जून ते १८ जुलैदरम्यान) एकूण ५३८.५१ मिमी, तर सरासरी ७६.९७ मिमी इतका नोंदवला आहे. ठाण्यात ८७.१२, कल्याण ८०.६६, मुरबाड ६३.४७, उल्हासनगर ८१.४४, अंबरनाथ ७६.३०, भिवंडीत ८६.४६, शहापुरात ६३.०५ मिमी पाऊस झाला.जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने पाणीसाठाही वाढला आहे. त्यामध्ये मोडकसागर आणि तानसा ही धरणे जुलै महिन्यातच भरली आहेत. यामध्ये मोडकसागर धरणाचे ५ आणि ६ क्र मांकांचे दरवाजे दोन दिवसांपूर्वीच उघडून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे, तर तानसा धरणाचे दरवाजे मंगळवारी उघडून विसर्ग सुरू झाला आहे. भातसामध्ये ७८ टक्के साठा झाल्यावर दरवाजे उघडण्यात येणार आहेत. सध्या ते धरण ७२.६२ टक्के इतके भरले आहे.>पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव काठोकाठमुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव काठोकाठ भरले आहेत. यापैकी चार तलाव भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबईचे पाण्याचे टेन्शन मिटले आहे. हा आनंद पालिका प्रशासनाने स्थायी समितीत बुधवारी पेढे वाटून व्यक्त केला. जुलैच्या पहिल्याच पंधरवड्यात तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा तलाव भरून वाहू लागले. तर अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा हे शासनाच्या अखत्यारितील तलावही भरले आहेत. तलावात आजच्या दिवशी सुमारे ११ लाख दशलक्ष लिटर जलसाठा आहे. मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावात १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर साठा आवश्यक आहे.

टॅग्स :Damधरण