शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

विलगीकरणानंतर ३२८ पोलीस पुन्हा झाले सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 00:22 IST

दरम्यान, कोरोनावर मात केल्यानंतर आतापर्यंत १६ अधिकारी व १३८ कर्मचारी, असे १५४ पोलीस हे पुन्हा ड्युटीवर हजर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जितेंद्र कालेकर ठाणे : कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले अल्प धोकादायक स्थितीतील (लो रिस्क) ३२८, तर अतिधोकादायक स्थितीतील पाच असे ३३३ कोविड युद्धे पोलीस पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू झाले आहेत. त्यात पोलीस मुख्यालयातील सर्वाधिक म्हणजे १३७ पोलीस आहेत. दरम्यान, कोरोनावर मात केल्यानंतर आतापर्यंत १६ अधिकारी व १३८ कर्मचारी, असे १५४ पोलीस हे पुन्हा ड्युटीवर हजर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोनामुळे आतापर्यंत ३३ अधिकारी आणि ३०९ कर्मचारी, असे ३४२ पोलीस बाधित झाले आहेत. बाधित पोलीस, नागरिक किंवा आरोपींच्या संपर्कात आल्यामुळे ठाणे शहर पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन व्हावे लागले. सुरुवातीला मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड हे बाधित झाल्यानंतर तेथील काही अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचाºयांनाही क्वारंटाइन व्हावे लागले. हीच परिस्थिती वर्तकनगर पोलीस ठाण्यावर एका हाणामारीतील आरोपीमुळे ओढवली. वर्तकनगरच्या वरिष्ठ निरीक्षकासह दोन अधिकारी तर पोलीस ठाण्यातच क्वारंटाइन होऊन ५५ दिवस कुटुंबांपासून दूर राहिले.प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचारी आपला १४ दिवसांचा विलगीकरणाचा कार्यकाळ संपवून पुन्हा ड्युटीवर रुजू होत आहेत. मुंब्रा पोलीस ठाण्यात १७ अधिकारी आणि ५२ कर्मचारी, असे ६९ पोलीस पुन्हा रुजू झाले. पोलीस मुख्यालयातील एका अधिकाºयासह १३६ कर्मचारी असे १३७, तर उल्हासनगरच्या सेंट्रल पोलीस ठाण्याचे चार अधिकारी आणि ११ कर्मचारी असे १५, अंबरनाथच्या एका अधिकाºयासह १२, वर्तकनगरच्या तीन अधिकाºयांसह ३० तसेच वाहतूक शाखेचे एक अधिकारी आणि २० कर्मचारी, असे २१ जण तर, त्याचबरोबर विशेष शाखेचे सहा पोलीस असे संपूर्ण आयुक्तालयातून ४६ अधिकाºयांसह ३२६ पोलीस कर्तव्यावर पुन्हा रुजू झाले आहेत.कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यानंतर १४ दिवस विलगीकरणात राहिल्यानंतर कोणताही त्रास नसल्याचे आढळल्यानंतर हे पोलीस कर्मचारी आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेऊन आतापर्यंत २६ अधिकारी आणि २३४ कर्मचारी अशा २६० पोलिसांनी यशस्वीपणे त्यावर मात केली. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर १४ दिवस विश्रांती घेऊन त्यातील १६ अधिकारी आणि १३८ कर्मचारी, असे १५४ पोलीस हे पुन्हा कर्तव्यासाठी आणि कोरोनाच्या लढाईला सामोरे जाण्यासाठी हजर झाले आहेत.>रुग्णालयात दाखल झालेले पोलीस किंवा नागरिक यांच्या प्रकृतीबाबत ते बरे होईपर्यंत डॉक्टर तसेच प्रशासनामार्फत त्यांची चौकशी केली. शक्य झाल्यास रुग्णाशीही थेट फोनद्वारे बातचीत केली. त्यांना प्रेरणा देऊन त्यांच्यातील मनोबल वाढविले.- विवेक फणसळकर,पोलीस आयुक्त, ठाणे शहर