शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनंतर डोंबिवलीत होणार पासपोर्ट सेवा केंद्र, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 17:28 IST

केंद्रातील मोदी सरकारच्या गेल्या कालखंडात दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कार्यकाळात देशभरात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

डोंबिवली - कल्याण लोकसभा मतदारसंघातील लाखो नागरिकांच्या सोयीसाठी मतदारसंघात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले असून अखेरीस डोंबिवली एमआयडीसी येथील पोस्ट ऑफिसची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेले लॉकडाउन उठवण्यात आल्यानंतर लवकरात लवकर हे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कळवण्यात आले आहे.

केंद्रातील मोदी सरकारच्या गेल्या कालखंडात दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कार्यकाळात देशभरात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तत्कालीन परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून कल्याण लोकसभा मतदारसंघात डोंबिवली येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळवली होती. परंतु, हे सेवा केंद्र सुरू करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आखून दिलेल्या जागेच्या निकषांची पूर्तता करण्याबाबत काही अडचणी येत होत्या. त्यासंदर्भात देखील खासदार डॉ. शिंदे यांनी टपाल खात्याशी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी सातत्याने पत्रव्यवहार केला होता. परराष्ट्र खात्याचे तत्कालीन सचिव ज्ञानेश्वर मुळे, टपाल खात्याचे तत्कालीन मंत्री मनोज सिन्हा, विद्यमान राज्यमंत्री संजय धोत्रे, तसेच टपाल खात्याच्या स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन एमआयडीसी येथील पोस्ट ऑफिसमध्ये सदरचे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यासाठी मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले.

या प्रयत्नांना आता यश आले असून लॉकडाउन उठल्यानंतर सदरचे सेवा केंद्र सुरू करण्याबाबत सर्व तयारी झाली असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने खासदार डॉ. शिंदे यांना कळवले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील सुमारे २० ते २५ लाख नागरिकांना याचा फायदा होणार आहे. त्यांना पासपोर्ट विषयक कामासाठी आता ठाणे किंवा मुंबईपर्यंत हेलपाटे मारण्याची आवश्यकता उरणार नाही, अशा शब्दांत खासदार  डॉ. शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीpassportपासपोर्ट