शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्येत झाली वाढ; भिवंडी परिसरात प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 23:50 IST

सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने परिस्थिती चिघळली

- नितीन पंडितभिवंडी : शासकीय यंत्रणेच्या कठोर प्रयत्नांनंतर आटोक्यात आलेली भिवंडीतील कोरोना रुग्णसंख्या आता पुन्हा वाढण्याच्या मार्गावर आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला.

भिवंडी शहर व ग्रामीण भागांत सुरुवातीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी महापालिकेत काही बदल करण्यात आले. त्यानुसार, आयएएस दर्जाचा आयुक्त नियुक्त करून, तज्ज्ञ व अनुभवी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. त्याचबरोबर कोविड सेंटर उभारणी व अ‍ॅण्टीजेन चाचण्यांवर महापालिका प्रशासनाने भर देत शहरातील कोरोनाचे प्रमाण आटोक्यात आणले होते. ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून कमी होत होती.

शहरात १५ ते २0, तर ग्रामीण भागात दररोज २0 ते २५ रुग्णांची नोंद होत होती. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढल्याने शहराबरोबरच ग्रामीण भागातील कोविड सेंटरमध्ये रुग्ण कमी व बेड जास्त अशी परिस्थिती काही काळ निर्माण झाली होती. मात्र, गणेशोत्सव काळात भिवंडीतील रुग्णसंख्या कमालीची वाढली आहे. गणेशोत्सव काळात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न झाल्याने रुग्णसंख्या वाढल्याचे बोलले जात आहे. गणेशोत्सव काळात गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रविवारी शहरात एकाच दिवशी ४८ रुग्णांची वाढ झाली, तर ग्रामीण भागात तब्बल १00 रुग्ण वाढले आहेत.

भिवंडी शहर ग्रामीण भागात एकाच दिवसात १४८ रुग्ण सापडल्याने शासकीय यंत्रणेवर पुन्हा ताण वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेपुढे पुन्हा एकदा रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचे आव्हान आहे. भिवंडी शहरात आतापर्यंत एकूण ४३४२ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ३८७९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत शहरातील २९0 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात ४२७३ रुग्णांची नोंद झाली असून त्यातील ३४३८ रुग्ण बरे झाले आहेत. ग्रामीण भागात आतापर्यंत १४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस