शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपपाठोपाठ काँग्रेसही कांदे घेऊन मैदानात; राजकीय वादाचा ठाणेकरांना फायदा

By अजित मांडके | Updated: December 4, 2023 16:16 IST

सध्या बाजारपेठेत कांद्याचा भाव ६० ते ७० रुपये एवढा झाला आहे

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: काही दिवसांपूर्वी ठाण्यात भाजपच्या वतीने स्वस्त दरात कांदे वाटप करण्यात आल्यानंतर त्यानंतर आता ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने देखील ठाणेकरांसाठी स्वस्त दरात कांदे वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. कांद्यावरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये चढाओढ सुरु झाली असली तरी त्याचा फायदा मात्र सर्वसामान्य ठाणेकरांना झाल्याचे दिसून आले आहे.

सध्या बाजारपेठेत कांद्याचा भाव ६० ते ७० रुपये एवढा झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. परंतु आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून याचेही भांडवल करीत सध्या ठाण्यात राजकीय स्पर्धा रंगली आहे. आधी ठाण्यात भाजपच्या वतीने स्वस्त दरात कांदे विक्री करण्यात आली होती. यावेळी त्यांनी २५ रुपये दराने कांद्याची विक्री केली होती. शहराच्या विविध भागात भाजपने स्टॉल उभारले होते. त्यानंतर या स्पर्धेत आता ठाणे शहर कॉंग्रेसही उतरली आहे. त्यांनी देखील आता ठाणेकरांना स्वस्त दरात कांदे देऊ केले आहेत.

ठाणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांच्या वतीने व ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली २५ रूपये कीलो प्रमाणे प्रत्येकी ४ कीलो कांदे वितरण करण्यात आले.  या उपक्रमाचे उद्घाटन शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण याच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाला खूप मोठी गर्दी नागरिकांनी केली होती, परंतु काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध प्रत्येकी चार कीलो कांदे वितरण केले. आयोजक व शहर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांनी सागितले की,सध्या वाढती महागाई पाहता नागरिक वाढत्या कांद्याच्या दराने त्रासली आहे अशा प्रसंगी काँग्रेसच्या वतीने शहरात स्वस्त दरात कांदे नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात येत आहे एकीकडे राज्यातील भाजप आघाडी सरकारमुळे दिवसे दिवस महागाई वाढतच चालली आहे अशा प्रसंगी ठाण्यातील नागरिकांना एक दिलासा म्हणून अशा उपक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक २२ खारकर आळी महागिरी,खारटन रोड व टेम्भी नाका परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला लवकर ठाण्यातील विविध भागात काँग्रेसच्या वतीने अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहीती त्यांनी  दिली.

टॅग्स :onionकांदा