शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

शाळा बंद करण्याच्या भिवंडी पालिकेच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांचे पालिका मुख्यालयात आंदोलन

By नितीन पंडित | Updated: October 9, 2023 19:11 IST

आसबीबी येथे पालिकेची शाळा क्रमांक ६५ असून या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी मध्ये एकूण ६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरातील आसबिबी परिसरात असलेली महानगरपालिका शाळा क्रमांक ६५ ची शाळा इमारत सुविधा नसल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.त्याविरोधात सोमवारी पालकांनी आपल्या पाल्यांसह पालिका मुख्यालय गाठत मुख्यालयात आंदोलन केले. त्यानंतर पालिका प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत शाळा त्याच ठिकाणी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले. 

आसबीबी येथे पालिकेची शाळा क्रमांक ६५ असून या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी मध्ये एकूण ६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या शाळेत विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी व शौचालय सुविधा नसल्याने अनेकांनी तक्रारी केल्याने याची दखल घेत राज्य मानवी हक्क आयोगाने सुमोटो दाखल केली होती.त्यावर पालिका प्रशासनाने म्हणणे न मांडल्याने राज्य मानवी हक्क आयोगाने ही शाळा बंद करण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर तत्कालीन आयुक्त यांनी तात्पुरत्या स्वरूपात फिरते शौचालय व्यवस्था केल्याने शाळा सुरू होती.परंतु पालिका प्रशासनाने पुन्हा नव्याने शाळा बंद करण्याचा निर्णय जाहीर करीत येथील विद्यार्थ्यांचे स्थलांतर एक किलोमीटर अंतरावरील रावजी नगर येथील शाळा क्रमांक ७३ या ठिकाणी केले.

लहान मुले रस्ता ओलांडून जाताना अपघाता घडण्याची शक्यता असल्याने  या निर्णयास शाळेतील विद्यार्थी व पालक यांनी विरोध दर्शवला असून त्यांनी थेट पालिका मुख्यालय गाठून तेथे आंदोलन केले .त्यानंतर पालिका प्रशासनाने आहे त्याच ठिकाणी शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी व पालकांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे.  

टॅग्स :BhiwandiभिवंडीSchoolशाळा