शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

आगरी समाजाच्या आक्रमकतेनंतर अखेर 'त्या' हॉटेलच्या पत्रा शेडवर पालिकेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 20:38 IST

वरसावे नाक्यावरील फाऊंटन हॉटेलच्या मालक-कर्मचारी व घोडबंदर ग्रामस्थांमधील दंगलीनंतर आक्रमक झालेल्या आगरी समाजामुळे अखेर महापालिकेने आज बुधवारी हॉटेलच्या आवारातील बेकादेशीर शेडचे बांधकाम पाडुन टाकले.

मीरारोड - वरसावे नाक्यावरील फाऊंटन हॉटेलच्या मालक-कर्मचारी व घोडबंदर ग्रामस्थांमधील दंगलीनंतर आक्रमक झालेल्या आगरी समाजामुळे अखेर महापालिकेने आज बुधवारी हॉटेलच्या आवारातील बेकादेशीर शेडचे बांधकाम पाडुन टाकले. तसेच हॉटेलच्या मूळ परवानगीसह वाढीव पक्काया बांधकामाबाबत पालिकेने नोटीस बजावली असुन शुक्रवारी सुनावणी ठेवली आहे.शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील वरसावे नाका येथे असलेल्या फाऊंटन हॉटेलवर पान खाण्यासाठी गेलेल्या घोडबंदर गावातील तरुणांना त्यांची दुचाकी उभी करण्यावरुन हॉटेलचे बाऊंसर, रखवालदार आदींनी शिवीगाळ करत दमदाटी, मारहाण केली. याची माहिती गावात कळताच गावातील रहिवाशी हॉटेलवर गोळा झाले. तर हॉटेलचे कर्मचारी देखील मोठ्या संख्येने जमले होते. वादावादी वाढत जाऊन त्याचे पर्यावसान तुंबळ हाणामारी, दगडफेक, सोडा वॉरच्या बाटल्या फेकण्यात झाले. यात ग्रामस्थांसह एक पोलीस जखमी झाला. पोलीसांनी हॉटेलच्या ३६ जणांना तर गावातील ८ जणांना अटक केली होती.दरम्यान या घटनेचे पडसाद आगरी समाजात उमटले. सोमवारी शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्यासह उपमहापौर चंद्रकांत वैती, सेना नगरसेवक राजु भोईर, आगरी समाजाचे प्रमुख शांताराम ठाकुर, सुरेश पाटील, सेनेचे जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे, केशव घरत, चिंतामण पाटील, राजु ठाकुर तसेच मोठ्या संख्येने पालघर - ठाण्याचे आगरी समाजाचे पदाधिकारी, ग्रामस्थांनी काशिमीरा पोलीस ठाण्याला घेराव घातला होता.आगरी समाजासह ग्रामस्थांनी, फाऊंटन हॉटेलचा मालक तलाह मुखी भाजपात असुन स्वत: घटनेत सहभागी असताना राजकीय आशीर्वादामुळे पोलीस, पालिका आदी संरक्षण देत असल्याचा आरोप केला होता. सदर हॉटेल सीआरझेड व आदिवासींच्या जागेवर असून बेकायदा बांधकाम आणि खोट्या परवानग्या घेतल्या आहेत. यांचेच दिल्ली दरबार इन हे हॉटेल गॅरेजच्या परवानगीच्या नावाखाली बेकायदा चालले आहे. रात्रभर ही हॉटेलं कशी चालतात? असा सवाल करत या ठिकाणी गैरप्रकार चालत असल्याचे आरोप केले गेले होते.दरम्यान पालिकेने आगरी समाजाच्या आरोपांची दखल घेत आज बुधवारी हॉटेलच्या आवारात बेकायदेशीर बांधलेली मोठी गेमझोनची शेड जेसीबीने पाडून टाकली. यावेळी काशिमीरा पोलिसांसह महापालिकेचे पथक, बाऊंसर तसेच अन्य प्रभाग अधिकारी उपस्थित होते. शेड बाबत आधीच तक्रार होती व नोटीस दिल्याचे प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे म्हणाले. हॉटेलच्या पक्कया बांधकामाबाबत देखील हॉटेल मालकास नोटीस दिली असून शुक्रवारी त्याबाबत सुनावणी ठेवली आहे. त्या नंतर अनधिकृत बांधकामाबाबत निर्णय घेऊन कारवाई केली जाईल असे बोरसे म्हणाले.

 

टॅग्स :mira roadमीरा रोडhotelहॉटेल