शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

३० वर्षांनंतर आजीबाई आपल्या गोतावळ्यात परतल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 09:45 IST

Thane News: तीस वर्षांपूर्वी मुलाचा डोळ्यासमोरच मृत्यू झाला होता. या घटनेने अंतर्बाह्य हादरून गेलेली एक महिला घरातून निघून गेली होती. तिचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते.

ठाणे - तीस वर्षांपूर्वी मुलाचा डोळ्यासमोरच मृत्यू झाला होता. या घटनेने अंतर्बाह्य हादरून गेलेली एक महिला घरातून निघून गेली होती. तिचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते. दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी उपचारासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात  तिला दाखल केले. मात्र तिच्या घराचा पत्ता नव्हता, कुटुंब कोठे राहते याचा मागमूस नव्हता. अखेर रुग्णालयाने पोलिसांच्या मदतीने त्या आजीबाईंच्या घराचा पत्ता शोधला आणि तिच्या कुटुंबाशी भेट घडवून आणली. ३० वर्षांनंतर आजी आपल्या गोतावळ्यात परतल्या. 

मानसिक स्वास्थ्य हरवले८० वर्षांच्या ताराबाई मोरे (नाव बदलले आहे) या ३० वर्षांपूर्वी घरातून निघून गेल्या. मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या ताराबाई दोन वर्षांपूर्वी नाशिक पोलिसांना आढळून आल्या होत्या. त्यांना उपचारासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले होते. 

ताराबाई या  कुठून आल्या,  याची कोणतीच माहिती मिळत नव्हती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना शोधायचे कसे हा प्रश्न रुग्णालयापुढे होता. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ताराबाई यांच्यावर उपचार आणि त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू होते, अशी माहिती रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक नितीन शिवदे यांनी दिली.  

‘पंचवटी’ एवढेच म्हणायच्या...ताराबाई यांच्या घरचा पत्ता विचारल्यास त्या पंचवटी एवढंच सांगायच्या. याबाबत रुग्णालयाने पंचवटी पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, फारसा उपयोग झाला नाही. दरम्यानच्या, काळात ताराबाईंवर समुपदेशन, औषधोपचार सुरू होते. त्यांच्याशी विचारपूस करताना अहिल्यानगर शहरातील एका परिसराचे नाव त्यांनी सांगितले असता, रुग्णालयाने पोलिसांशी संपर्क करून ताराबाई यांची माहिती दिली.  पोलिस आणि रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या कुटुंबाचा शोध घेतला. नुकतेच त्यांना कुटुंबाकडे सुपूर्द केले. यासाठी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहम्मद  फैजल मोहम्मद सादिक, डॉ. मधुरा गायकवाड, यांनी परिश्रम घेतले.

ताराबाई यांचा १३ वर्षांचा मुलगा झाडावर चढला होता. विजेच्या तारेचा झटका लागून त्याचा मृत्यू झाला होता. आपल्या मुलाचा डोळ्यासमोर झालेला मृत्यू बघून ताराबाई यांचे मानसिक संतुलन बिघडले. साधारण ३० वर्षांपूर्वी घरातून न सांगताच बाहेर पडल्या होत्या.  - नितीन शिवदे (समाजसेवा अधीक्षक, मनोरुग्णालय, ठाणे) 

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकthaneठाणे