शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २२ वर्षांनी पुन्हा रंगणार चांदणं संमेलन; जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांसह महापौर लावणार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 01:29 IST

रंगणार साहित्यिक गप्पा

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणारे चांदणं संमेलन तब्बल २२ वर्षांनी पुन्हा एकदा ठाण्यात रांगणार आहे. रसिकांच्या आग्रहाखातर ते पुनर्जीवित केले असून साहित्यिक गप्पा, मुलाखती, शब्दमोती, गजल, संगीत, कथा-काव्य स्पर्धा, अनुभवकथन अशा विविध कार्यक्रमांनी ते रंगणार आहे. यावेळी झुणकाभाकर, चहा, दुधाचादेखील आस्वाद श्रोत्यांना घेता येणार आहे.

मराठी ग्रंथसंग्रहालयाचे तत्कालीन अध्यक्ष श्याम फडके यांनी साधारण १९७७-७८ साली चांदणं संमेलन ही संकल्पना राबवली. पाच ते सात वर्षे हे संमेलन सुरू राहिले आणि त्यानंतर बंद पडले. १९८८ साली शशी जोशी हे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे तत्कालीन अध्यक्ष, कार्याध्यक्ष असताना त्यांनी या संमेलनाला पुनर्जीवित केले आणि साधारण १९९७ सालापर्यंत ते सुरू राहिले. संग्रहालयाच्या गच्चीवर ते भरविले जात होते.

चंद्रप्रकाशात बसून कलाकारांबरोबर गप्पा, त्यांच्यासह रसिक श्रोत्यांचे सादरीकरण, गप्पा, स्पर्धा, कलाकारांच्या आठवणी, त्यांचे किस्से, एखाद्या कार्यक्रमातील प्रसंग ते कथन करीत असत. आम्ही त्यावेळी या संमेलनाला प्रेक्षकांचा सहभाग असलेले संमेलन म्हणत असत. त्यावेळच्या चांदणं संमेलनाचे माजी कार्यवाह, लेखक मकरंद जोशी यांनी या संमेलनाच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले. यावेळी विनोदकथन स्पर्धा, असंबद्ध बोलणे, विडंबन काव्य स्पर्धा या विविध स्पर्धांबरोबर फिशपॉण्ड कार्यक्रमदेखील होत असे, असे जोशी यांनी अधिक माहिती देताना सांगितले.

या मातब्बरांनी लावली आहे हजेरी

या संमेलनाला व.पु. काळे, प्रभाकर पणशीकर, सुरेश खरे, सुहास शिरवळकर, यशवंत देव आणि करुणा देव यासारख्या अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली आहे. या संमेलनाचेही स्वरूप सारखेच असणार आहे, असे संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी सांगितले.

यंदाचे संमेलन १५ फेबु्रवारीलायंदा ते १५ फेब्रुवारी रोजी मराठी ग्रंथसंग्रहालयात असणार आहे. या संमेलनाला जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, महापौर नरेश म्हस्के, ज्येष्ठ व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे, व्याख्यात्या धनश्री लेले, ज्येष्ठ कवी अरु ण म्हात्रे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र