शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची १२६४ मते बाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 01:03 IST

जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची गुरुवारी ठिकठिकाणी मतमोजणी झाली.

सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची गुरुवारी ठिकठिकाणी मतमोजणी झाली. ईव्हीएम मतदानयंत्रांतील सर्व मतदान ग्राह्य धरण्यात आले. मात्र, सरकारी सेवेतील काही मतदारांनी पोस्टल बॅलेटपेपरच्या साहाय्याने मतदानाचा हक्क बजावला. परंतु, या बॅलेटपेपरद्वारे मतदानाची पद्धत माहीत नसल्यामुळे काहींनी ते चुकीच्या पद्धतीने केले. यामुळे तिन्ही मतदारसंघांतील पोस्टल बॅलेटपेपरची १२६४ मते बाद ठरवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत ६६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यांना ३० लाख ५७ हजार ८७६ मतदारांनी मतदान केले. यामध्ये सरकारी नोकरीनिमित्त मतदारसंघापासून लांब वास्तव्यास असलेले, सैन्यदलात असलेले आणि परदेशात वास्तव्य असलेले पण या मतदारसंघाचे मतदार असलेले आदींनी पोस्टल बॅलेटपेपर आणि ईटीटीपी या दोन पद्धतीने मतदानाचा हक्क बजावला. यानुसार, नऊ हजार ४११ मतदारांनी या पोस्टल बॅलेटपेपरने मतदानाचा हक्क बजावला आहे. परंतु, यातील एक हजार २६४ मतदारांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केल्यामुळे त्यांची मते बाद ठरवण्यात आल्याचे मतमोजणीवरून उघडकीस आले आहे. ठाणे लोकसभा निवडणुकीत तीन हजार ८३२ मतदारांनी पोस्टल बॅलेटपेपरने मतदानाचा हक्क बजावला. यातील तीन हजार ३१९ मतदान ग्राह्य धरले. तर, ४५२ मतदारांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केल्यामुळे त्यांचे मत बाद ठरवण्यात आले, असे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी लोकमतला सांगितले. यातील उर्वरित ६१ मतदारांनी नोटाचा वापर करून २३ उमेदवारांपैकी एकालाही पसंती दिली नाही. याप्रमाणेच कल्याण लोकसभेसाठी दोन हजार ७३७ मतदारांनी पोस्टल बॅलेट पेपरने मतदानाचा हक्क बजावला. त्यातील दोन हजार ३२१ जणांचे मत ग्राह्य धरले.>भिवंडीत ४३३ कर्मचाऱ्यांचे मत झाले बाद३७९ मतदारांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केल्यामुळे त्यांचे मत बाद ठरले आहे. भिवंडी लोकसभेचे मतदार असलेल्या तीन हजार ८३२ मतदारांनी मतदान केले. परंतु, यातील ४३३ जणांचे मतदान बाद केले, तर ४२ जणांनी एकाही उमेदवारास पसंती न देता नोटाचा वापर करून मतदानाचा हक्क बजावला. यामुळे पोस्टल बॅलेटपेपरने मतदान करणाºयांमध्येदेखील मतदानाची जनजागृतीची गरज असल्याचे या चुकीच्या मतदानामुळे उघड झाले आहे. भिवंडी लोकसभेचे मतदार असलेल्या तीन हजार ८३२ मतदारांनी मतदान केले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019