शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

कोरोनाकाळात होतेय कुष्ठरुग्णांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:06 IST

कल्याण : केडीएमसी हद्दीतील कुष्ठरुग्णांना मनपा प्रशासनातर्फे दरमहिना अडीच हजार रुपये मानधन दिले जाते, परंतु मागील नऊ महिने त्यांना ...

कल्याण : केडीएमसी हद्दीतील कुष्ठरुग्णांना मनपा प्रशासनातर्फे दरमहिना अडीच हजार रुपये मानधन दिले जाते, परंतु मागील नऊ महिने त्यांना मानधन मिळालेले नाही. त्यामुळे कोरोनाच्या काळात त्यांची परवड होत आहे. या प्रश्नाबाबत मनपा प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही मानधनाला होणारा विलंब चर्चेचा विषय ठरला आहे.

पूर्वेतील हनुमाननगरमध्ये कुष्ठरुग्णांची १६० कुटुंबे आहेत. यातील काही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत, तर सध्या येथे १०७ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांना दररोज मलमपट्टी करावी लागते. यातील ६७ रुग्णांना दरमहिना अडीच हजार रुपये मानधन दिले जाते. कुष्ठरुग्णांना मानधन देणारी केडीएमसी राज्यातील पहिली महापालिका आहे. आयुक्त रामनाथ सोनवणे आणि महापौर कल्याणी पाटील यांच्या कार्यकाळात हा मानधनाचा निर्णय अंमलात आणण्यात आला. कुष्ठरुग्णांना मानधन मिळावे, यासाठी कुष्ठमित्र गजानन माने आणि माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी केला होता. अठरा विश्वे दारिद्र्य, त्यात उपजीविकेचे कोणतेच मार्ग उपलब्ध नव्हते. त्यामुळे मनपाकडून मिळणारे मानधन कुष्ठरुग्णांसाठी मोठा आधार ठरले आहे. मात्र, मागील सप्टेंबर, २०२० ते आजपर्यंत ते मानधनापासून वंचित आहेत.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे मानधनाअभावी कुष्ठरुग्णांची परवड होत आहे. माजी नगरसेवक शिंदे यांनी कुष्ठरुग्णांना लवकरात लवकर मानधन मिळावे, याकडे मनपाचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आणि आरोग्य विभागाचे लक्ष वेधले आहे. हनुमाननगर कुष्ठसेवा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी सोमवारी आरोग्य विभागात जाऊन मानधनाबाबत चौकशी केली असता नऊपैकी सहा महिन्यांचे मानधन येत्या चार ते पाच दिवसांत तातडीने दिले जाईल, अशी माहिती त्यांना देण्यात आली.

कुष्ठरुग्ण लसीपासूनही वंचित

हनुमाननगरमधील सुमारे १५० कुष्ठरुग्ण ४५च्या वरील वयोगटांतील आहेत. फेब्रुवारीपासून ४५ व त्यावरील वयोगटांसाठी कोविड लस देण्यास सुरुवात झाली, परंतु अद्याप हनुमाननगरमधील एकाही कुष्ठरुग्णाला लस दिली गेलेली नाही. बहुतांश रुग्ण हे बहुविकलांग आहेत. त्यांच्यावर जखमा असल्याने त्यांना रांगेत उभे राहणे शक्य नाही. त्यामुळे हनुमाननगरमध्ये विशेष लसीकरणाची मोहीम राबवावी, अशी मागणी हनुमाननगर कुष्ठसेवा संस्थेने केडीएमसीकडे केली आहे. दरम्यान, आधीच लसीचा तुटवडा असल्याने कुष्ठरुग्णांसाठी लसीकरण मोहीम राबविणे आव्हान ठरणार आहे.

-------------