शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत सुविधांच्या विकासाचा फायदा जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी जनतेला- पालकमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 13:24 IST

ठाणे जिल्ह्यातील विकासाच्या नव्या संधींचा फायदा येथील ग्रामीण आणि शहरी जनतेला होणार आहे.  मग ते ग्रोथ सेंटर असेल किंवा बिझनेस हब, मेट्रो, जलवाहतूक, सक्षम आरोग्य सेवा, क्लस्टर डेव्हलपमेंट असेल असे उद्गार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले

ठाणे- ठाणे जिल्ह्यातील विकासाच्या नव्या संधींचा फायदा येथील ग्रामीण आणि शहरी जनतेला होणार आहे.  मग ते ग्रोथ सेंटर असेल किंवा बिझनेस हब, मेट्रो, जलवाहतूक, सक्षम आरोग्य सेवा, क्लस्टर डेव्हलपमेंट असेल असे उद्गार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.भारतीय प्रजासत्ताकाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी साकेत मैदान येथे मुख्य शासकीय सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये राज्य राखीव दलापासून, ठाणे शहर पोलीस, वाहतूक पोलीस, कारागृह रक्षक, गृहरक्षक, कमांडो पथक,बॉम्बशोधक आणि नाशक पथक, दंगारोधक पथक अशा विविध पथकांचा समावेश होता. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा  लाभ

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनादेखील कर्जमाफीचा लाभ झाला असून  ५० कोटी १६ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं. 

सिंचन क्षमता वाढलीजलयुक्त शिवाराच्या या कामांमुळे जिल्ह्याची सिंचन क्षमता सात हजार हेक्टरनं वाढली असून रब्बीच्या दुबार क्षेत्रात सुमारे साडे तीन हजार हेक्टरनं वाढ झाली आहे. जिल्ह्यात ४ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड करण्यात आली असून प्रधानमंत्री आवास योजना तसंच, शबरी, रमाई या योजनांतर्गत परवडणारी घरं निर्माण करण्यात ठाणे जिल्हा आघाडीवर असल्याबद्धल त्यांनी अभिनंदन केले.

गतिमान प्रशासनाचे उत्तम उदाहरणग्रामविकास आणि महसूल विभागानं शंभर टक्के अर्ज निकाली काढून गतिमान प्रशासनाचं उत्तम उदाहरण आपल्या सर्वांसमोर ठेवलं आहे त्याचेही त्यांनी कौतुक केले.  नागरिकांना तत्पर सेवा देण्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये ३२ वर्क स्टेशन्स कार्यरत करण्यात आली असून ई-फेरफार, ऑनलाइन डाटा अपडेशन या सेवांमुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे असे ते म्हणाले.

पर्यटनाला चालनाठाणे जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी माळशेज घाटात जागतिक दर्जाचा स्कायवॉक बांधण्यात येणार असून टिटवाळा, श्रीमलंगगड या ठिकाणी देखील पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.