शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अदानीच्या गुजराती वीजबिलावर मराठी एकीकरण समितीचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 07:00 IST

कंपनीने ग्राहकांच्या सोईनुसार भाषा निवडीला प्राधान्य देत मीरा-भाईंदर शहरात गुजराती भाषेतील विद्युत बीले मोठ्या प्रमाणात वितरीत करण्यास सुरुवात केली.

भाईंदर : मुंबई उपनगरात सध्या अदानी इलेक्ट्रीसिटी या खासगी कंपनीमार्फत वीजपुरवठा केला जातो. या कंपनीने ग्राहकांच्या सोईनुसार भाषा निवडीला प्राधान्य देत मीरा-भाईंदर शहरात गुजराती भाषेतील विद्युत बीले मोठ्या प्रमाणात वितरीत करण्यास सुरुवात केली. त्यावर तीव्र आक्षेप घेत मराठी एकीकरण समितीने कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेत, विद्युत बीले केवळ मराठी भाषेतच काढावीत, अशी मागणी केली आहे.शहरात अगोदरच मराठी टक्का घसरत असल्याची ओरड होत असली तरी, मराठी भाषेला प्राधान्य देण्यासाठी सरकारी यंत्रणा अनुत्सूक असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यासाठी समितीने पुढाकार घेत अनेक सरकारी यंत्रणांतील परप्रांतीय भाषेच्या वापरावर आक्षेप घेत मराठी भाषेलाच प्राधान्य देण्यासाठी चळवळ सुरू केली. दरम्यान, मुंबई उपनगरात वीजपुरवठा करणारी पुर्वाश्रमीची रिलायन्स एनर्जी कंपनी ताब्यात घेतल्यानंतर अदानी इलेक्ट्रीसिटी कंपनीनेसुद्धा तोच पायंडा पाडण्यास सुरुवात केली आहे.कंपनीने ग्राहकांना भाषा निवडीचे प्राधान्य देणे सुरू केल्याने परप्रांतिय भाषिकांकडून राज्यातील मराठी भाषा वापरावर गडांतर येण्याची भिती समितीने व्यक्त केली जात आहे. समितीने अदानीच्या या अमराठी भाषा निवडीच्या उपक्रमाला तीव्र विरोध केला आहे. कंपनीच्या या भाषा निवडीच्या उपक्रमामुळे मीरा-भाईंदर शहरात मोठ्याप्रमाणात गुजराती भाषेत विद्युत बीले वितरीत केली जात आहेत. शहरात मराठी भाषिक अस्तित्वात असताना आणि मराठी महाराष्ट्राची राजभाषा असतानाही या खासगी कंपनीने राजभाषा अधिनियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप समितीने केला आहे. विद्युत बीलांवरील गुजराती भाषेवर तीव्र आक्षेप घेत समितीच्या मीरा-भाईंदर शहरातील शिष्टमंडळाने अदानी इलेक्ट्रीसिटी कंपनीच्या उत्तर विभागाच्या प्रमुख अधिकाºयांची भाईंदर येथील कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी मराठी भाषेला प्राधान्य देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. त्यावर अधिकाºयांनी ७ दिवसांत वरीष्ठांशी चर्चा करुन कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात मीरा-भाईंदर शहराध्यक्ष सचिन घरत, कार्याध्यक्ष प्रदीप सामंत, सचिव कृष्णा जाधव, पदाधिकारी प्रदीप जंगम, विभागीय अध्यक्ष अमित म्हात्रे, स्वप्निल तपासे आदींचा समावेश होता.

टॅग्स :electricityवीजmarathiमराठी