शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी पाणीपट्टी वाढणार, स्वच्छता लाभ कर व साफसफाई कर लागू करण्याचे प्रशासनाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 17:52 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या मर्यादित उत्पन्नवाढीसाठी प्रशासनाने पाणीपट्टीत किमान ३ रुपये वाढ करण्याचा विचार सुरू केला असून नवीन १० टक्के रस्ता करासह स्वच्छता लाभ व साफसफाई कर लागू करण्याचे संकेत दिले आहेत.

राजू काळेभार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या मर्यादित उत्पन्नवाढीसाठी प्रशासनाने पाणीपट्टीत किमान ३ रुपये वाढ करण्याचा विचार सुरू केला असून नवीन १० टक्के रस्ता करासह स्वच्छता लाभ व साफसफाई कर लागू करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचा प्रस्ताव तयार करण्यासाठी संबंधित विभागांकडून अहवाल मागविण्यात आला आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.पालिकेचे सरकारी अनुदानासह मूळ उत्पन्न सुमारे ७५० कोटी मर्यादित उत्पन्न असले तरी अंदाजपत्रक मात्र दुपटीने फुगविले जात आहे. यामुळे दरवर्षीच्या अंदाजपत्रकातील तुटीचा आकडा नागरिकांना मोफत पुरविण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांमुळे सतत वाढत असून तो भविष्यात धोकादायक ठरणारा असल्याचे मत वरिष्ठ अधिका-यांकडून व्यक्त केले जात आहे. १२ लाखांवरील लोकसंख्येच्या या शहरात विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यासाठी सरकारी अनुदाने मिळत असून, काही प्रकल्प सरकारी योजनांच्या माध्यमातूनही पूर्ण केले जात आहेत. काही प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी महापालिकेद्वारे ३० ते ५० टक्के निधी उभारणे आवश्यक असल्याने मर्यादित उत्पन्नामुळे ते अशक्य ठरत आहे.शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असले तरी ते १०० टक्के दुरुस्त करण्यासाठी पालिकेकडे अनेकदा पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. मर्यादित उत्पन्नातूनच पालिकेने एमएमआरडीएकडून घेतलेल्या कर्जापोटी वर्षाला सुमारे ४० कोटींचा हप्ता अदा करावा लागत आहे. त्यातच नवीन प्रकल्पांसाठी पालिकेला अपेक्षित कर्जे, मर्यादित उत्पन्नाच्या कारणास्तव वित्तसंस्थांकडून देण्यास नकार दिला जात आहे. उत्पन्न वाढीसाठी पालिकेच्या मालमत्ता बाजारभावाने भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव मुख्यलेखाधिकारी शरद बेलवटे यांनी गतवर्षी प्रशासनाला सादर केला होता. त्याला सत्ताधा-यांनी विरोध दर्शविल्याने अद्याप त्याचा पुनर्विचार करण्यात आलेला नाही. तसेच उत्पन्नवाढीसाठी प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचा आक्षेप गतवर्षीच्याच कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आला होता. ही बाब गांभीर्याने घेत पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी ३० नोव्हेंबर २०१६ रोजीच्या स्थायी समिती बैठकीत नवीन १० टक्के रस्ता कर लागू करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.तो चर्चा न करताच फेटाळून लावण्यात आला. यापूर्वी पालिकेने मालमत्ता करात स्वच्छता लाभ कराचा समावेश केला होता. परंतु त्यावेळी भुयारी गटाराचे काम अपूर्ण असतानाच त्या कराला सर्वच स्तरातून विरोध करण्यात आल्याने अखेर तो मागे घेण्यात आला. पालिकेला सध्या एमआयडीसीकडून १०० व स्टेमकडून ८६ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. यातील एमआयडीसीकडून पालिकेला ९ रुपये तर स्टेमकडून १० रुपये ९० पैसे प्रती १ हजार लीटर प्रमाणे शुल्क वसुल केले जात आहे. याउलट पालिकेकडून नागरिकांना ७ रुपये प्रती १ हजार लीटर दराने पाणीपुरवठा केला जात आहे. यात पालिकेला सरासरी २ ते ४ रुपये तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच पाणी उचलण्यासाठी लागणा-या वीजपुरठ्यासाठी देखील पालिकेला लाखोंचे वीजबिल अदा करावे लागत आहे. शहराची स्वच्छता राखणा-या सुमारे अडीच हजार कामगारांना किमान वेतन लागू करण्यात आल्याने पालिकेवर कोट्यवधींचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडला आहे. शहराला दिवाबत्तीची सोय मोफत उलब्ध करून दिली जात असल्याने पालिकेला त्यासाठी अतिरिक्त वीजबिल भरावे लागत आहे. या मूलभूत सुविधांपोटी पालिकेवर कोट्यवधींचा बोजा पडत असल्याने पालिकेच्या अंदाजपत्रकातील तुटीचा आकडा दरवर्षी वाढत आहे. तो कमी करण्यासाठी पालिकेचे उत्पन्न वाढविणे अत्यावश्यक ठरल्याचे मत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर