शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पुलाअभावी जीव धोक्यात घालून आदिवासींची नदीतून ये-जा; समस्यांचा पाढा म्हणजेच पालघरमधील मोखाड्यातील मुकुंदपाडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 13:25 IST

निवडणुका आल्या की इकडे पुढारी मते मागायला येतात. एरव्ही इकडे कुणी ढुंकूनही बघत नाहीत, असे इथल्या स्थानिक आदिवासी लोकांचे म्हणणे आहे. 

रवींद्र साळवे -मोखाडा : देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून १०० किमी अंतरावर मोखाडा  तालुक्यापासून ३५ ते ४० किमी अंतरावर दरी-डोंगरात बेरिस्ते ग्रामपंचायतीच्या हद्दीत आदिवासी लोकवस्तीचा वसलेला मुकुंदपाडा  हा आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. पावसाळ्यात मुकुंदपाडावासीयांचा संपर्क तुटतो. यामुळे एखादा माणूस आजारी पडल्यास किंवा शाळकरी मुलांना, चाकरमान्यांना दुथडी भरून वाहणाऱ्या वाल नदीतून अक्षरश: जीवाची बाजी लावून ये-जा  करावी  लागते.निवडणुका आल्या की इकडे पुढारी मते मागायला येतात. एरव्ही इकडे कुणी ढुंकूनही बघत नाहीत, असे इथल्या स्थानिक आदिवासी लोकांचे म्हणणे आहे. मुकुंदपाडा  हा समस्यांचा पाडा असून, राज्यापासून तुटलेला आहे. आमच्याकडे रस्त्याची सोय नाही. रुग्ण असल्यास डोली करून आठ किमीचा डोंगर पार करून दवाखाना गाठावा लागतो. अत्यवस्थ रुग्ण अनेकदा रस्त्यातच दगावतात. पावसाळ्यात आमची समस्या अधिकच बिकट बनते. तालुक्याशी संपर्क तुटून जातो. रेशन आणायला आम्हाला जीवाची बाजी लावून नदी पार करावी लागते, असे येथील स्थानिक आदिवासी गणपत पांडू भोये यांनी सांगितले.

येथे वीज सोडली तर कोणत्याच सुविधा नाहीत. पाणी, रस्ता, आरोग्य अशा कोणत्याच सुविधा नसलेल्या या गावातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर लाकडाची डोली करून तिला न्यावे लागते. वेळेत उपचार न मिळल्याने रुग्ण रस्त्यातच दगावतो. मागील आठ-दहा वर्षांत सहा रुग्ण उपचाराविना दगावले असल्याचे इथले लोक सांगतात. पावसाळ्यात तर या पाड्यांचा तालुक्याशी संपर्कच राहत नाही. अनेक सरकारी योजना येथे कागदावरच आहेत. त्यांची अंमलबजावणी झालेली नाही.   

स्वस्त धान्यासाठी ८ किमी पायपीट या १२८ आदिवासी लोकवस्तीच्या मुकुंदपाड्यावर सोयीसुविधांचा अभाव आहे. शाळाही गेल्या पाच-सहा वर्षांपासून बंद आहेत. पाण्याची सोय नाही. त्यामुळे बारमाही नदीवरून खड्डा खोदून पाणी आणावे लागते. एवढेच काय, रेशन दुकानातील धान्य आणण्यासाठी आठ किलोमीटरचा भला मोठा डोंगर पार करून त्यांना चिकाडीचा पाडा गाठावा लागतो. बरे, एकाच फेरीत रेशन मिळेल याची शाश्वती नसते. यामुळे एका महिन्याचे धान्य आणण्यासाठी चार-पाच वेळा फेऱ्या माराव्या लागतात. पावसाळ्यात नदीच्या पलीकडे ये-जा करावी लागत असल्याने जीवघेणी कसरत करावी लागते.

टॅग्स :palgharपालघर