आदीवासी वस्तीगृहातील जेवणात आळ्य़ा, विद्यार्थांचे अन्नत्याग आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 05:12 PM2017-11-26T17:12:22+5:302017-11-26T17:12:30+5:30

सरकारी आदिवासी विद्यार्थी वस्तीगृह आहे. या वस्तीगृहातील विद्यार्थांना दिले जाणा:या जेवणात आळ्य़ा आढळून आल्याची तक्रार विद्यार्थांनी केली आहे.

Adivasi residences are being eaten in the kitchen, students' food intensive movement | आदीवासी वस्तीगृहातील जेवणात आळ्य़ा, विद्यार्थांचे अन्नत्याग आंदोलन

आदीवासी वस्तीगृहातील जेवणात आळ्य़ा, विद्यार्थांचे अन्नत्याग आंदोलन

Next

कल्याण- शहराच्या पश्चिम भागातील बिर्ला कॉलेजनजीक सरकारी आदिवासी विद्यार्थी वस्तीगृह आहे. या वस्तीगृहातील विद्यार्थांना दिले जाणा:या जेवणात आळ्य़ा आढळून आल्याची तक्रार विद्यार्थांनी केली आहे. वस्तीगृहाला जेवण पुरविणा:या कंत्रटदाराच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. या प्रकरणी विद्यार्थांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. जेवण पुरविणा:या कंत्रटदाराला नोटिस बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 
आदीवासी वस्तीगृहात राहून 96 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थांना दोन वेळचे जेवण पुरविण्याचे काम भिवंडीच्या जागृती महिला बचत गटाला देण्यात आले आहे. शुक्रवारी या विद्यार्थांना पनीरची भाजी दिली गेली होती. त्या भाजीत चक्क आळ्य़ा आढळून आल्याची बाब स्वत: विद्यार्थांनी उघडकीस आणली आहे. तसेच फळांमध्ये त्यादिवशी मुलांना केळी खाण्यास दिली असता त्याला ही किड लागल्याचे दिसून आले. याविषयी प्रथम महिला बचत गटाकडे विद्याथ्र्यानी विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना दमदाटी करण्यात आली असा आरोप विद्यार्थांनी केला आहे. एका विद्यार्थांच्या जेवणामागे महिन्याला 3 हजार 200 रुपये महिला बचत गटाला सरकारकडून दिले जातात. विद्यार्थांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. वस्तीगृह प्रशासनाकडून यापूर्वी महिला बचत गटाला कारणो दाखवा नोटिस बजाविली आहे. मात्र आत्ता आळ्य़ा आढळून आल्या त्याचे काय असा सवाल विद्यार्थी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. ही घटना कळताच जवळच राहणारे शिवसेनेचे उपशहर प्रमुख रवी पाटील यांनी आज वस्तीगृहाला भेट दिली. तसेच वस्तीगृहाची पाहणी केली. वस्तीगृहाची दुरावस्था झाली असून विद्यार्थांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते. त्यात आळ्य़ा सापडतात. ही गंभीर बाब आहे. वस्तीगृहाची  देखरेख करणारा अधिकारी कल्याणमध्येच राहतो. मात्र तो वर्ष झाले तरी त्या वस्तीगृहाकडे ढुंकून पाहत नाही असा आरोप पाटील यांनी केला आहे. 

Web Title: Adivasi residences are being eaten in the kitchen, students' food intensive movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.