शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

आदर्श कारभार बघायला ठाण्याला या - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 03:47 IST

पोलीस, राजकीय यंत्रणा आणि महापालिका प्रशासन एकत्र आल्यावर काय करूशकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ठाण्याचे द्यावे लागेल.

ठाणे : पोलीस, राजकीय यंत्रणा आणि महापालिका प्रशासन एकत्र आल्यावर काय करूशकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ठाण्याचे द्यावे लागेल. त्यामुळेच एक आदर्श कारभार बघायचा असेल तर ठाण्याला यावे, असे प्रसंगोद्गार बुधवारी शिवसेनेचे नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे काढले.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कासारवडवली येथील कावेसर भागातील आरक्षित भूखंडावर दोन एकरांच्या परिसरात उभारलेल्या चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कच्या लोकार्पणानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत महापौर मीनाक्षी शिंदे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आदींसह हा प्रकल्प हवा, म्हणून ज्यांनी पुढाकार घेतला, त्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर उपस्थित होत्या. ठाणे शहरात राजकीय यंत्रणा, विकासक, पोलीस आणि पालिका प्रशासन यांच्या असलेल्या समन्वयातून अनेक प्रकल्प ठाणे शहरात सुरू असल्याचेही त्यांंनी सांगितले. दरम्यान, ट्रॅफिक पार्कच्या अनुषंगाने शहरात वाहतूककोंडी का होते, याची साधी कारणे आहेत. परंतु, ती सोडवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे असून अवजड वाहनांनी त्यांची लेन पाळल्यास अपघात आणि कोंडीही होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्लास्टिकबंदीबाबतही त्यांनी हा निर्णय भविष्याच्या दृष्टीने घेण्यात आला असून त्याचा आता त्रास होत असला, तरी पावसाळ्यात होणारी हानी यामुळे टाळता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या हस्ते नितीन कंपनी आणि मानपाडा उड्डाणपुलाखालील गार्डनचेही लोकार्पण करण्यात आले.शहरात नव्याने खड्डे नाहीतशहरात खड्डे पडले आहेत, हे खरे आहे. परंतु, ते नव्याने पडलेले नसल्याचा दावा आदित्य यांनी यावेळी केला.पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी, पालिका प्रशासन आदींच्या रस्त्यांवर खड्डे पडले असून ते युद्धपातळीवर बुजवण्याचे काम पालिका प्रशासन आणि येथील स्थानिक राजकीय यंत्रणा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाAditya Thackreyआदित्य ठाकरे