शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

ठाणे जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे पालन; सहा हजार ७०४ पाेस्टर्सवर कारवाई

By सुरेश लोखंडे | Updated: March 19, 2024 18:20 IST

तिन्ही लाेकसभा मतदारसंघात लागलेली भूमिपूजन, उद्घाटनांच्या सहा हजार ७०४ पाेस्टर्स, बॅनर्सवर कारवाई केल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांनी दिली.

ठाणे : जिल्ह्यातील तिन्ही लाेकसभा मतदारसंघात लागलेली भूमिपूजन, उद्घाटनांच्या सहा हजार ७०४ पाेस्टर्स, बॅनर्सवर कारवाई केल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कायार्लयात सर्व राजकीय पक्षांची बैठक शिनगारे यांनी घेतली. त्यांनी आचारसंहितेचे काटेकाेर पालन करण्याच्या सूचना पक्षांच्या सदस्यांना दिल्या. आचारसंहितेच्या काळात काय करावे, काय करू नये, नामनिर्देशन पत्र कसे भरावे, याबाबत पक्षांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. निवडणूक खर्च निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

बैठकीला अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, मुख्य भूमी व भूमापन अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी विजयसिंह देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, तहसीलदार प्रदीप कुडळ, तहसीलदार उज्ज्वला भगत यांच्यासह संबंधित अधिकारी व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १९५०लाच देणे, अवाजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकदपटशा दाखविणे याबाबत काही तक्रारी असतील तर जिल्ह्याच्या तक्रार नियंत्रण कक्षातील १९५० या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. हा कक्ष २४ तास सुरू आहे, असे शिनगारे यांनी सांगितले. निवडणूक खर्चाबाबत नवी मुंबई महापालिकेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी सत्यवान उबाळे आणि ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस ठाणे महापालिकेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी दिलीप सूर्यवंशी, स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाचे सहायक संचालक दीपक बोडके, जिल्हा कोषागार अधिकारी सुरेंद्र राऊत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४thaneठाणे