शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

जिल्ह्यात लसींचा पुरेसा साठा, आतापर्यंत दोन लाख २१ हजार ३६३ जणांचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 9:31 AM

 मार्च महिन्याच्या १ तारखेपासून सर्वत्र ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिकांसह ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. 

ठाणे: ठाणे  महापालिका हद्दीत कोविशिल्ड लसीचा तुटवडा उद्भवल्याने दुसरा डोस मिळणार की नाही, याबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत. मात्र, कोविशिल्ड लसींचा ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण भागातील आरोग्यकेंद्रांवर पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यामुळे ग्रामीण भागात ज्यांनी ज्यांनी कोविशिल्डची पहिली लस घेतली असेल, त्यांना त्याची दुसरी लसही तिच दिली जाणार आहे.  मार्च महिन्याच्या १ तारखेपासून सर्वत्र ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिकांसह ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दोन लाख २१ हजार ३६३ जणांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये एक लाख ८२ हजार ५३४ जणांना पहिला डोस दिला असून, ३८ हजार ८२९ जणांनी दुसरा डोस घेतला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी दिली. फेब्रुवारी महिन्याच्या पंधरवड्यानंतर ठाणे  जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाने आपले डोके वर काढले आहे. त्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याची चर्चादेखील जिल्ह्यात सर्वत्र सुरू  आहे. त्यामुळे कोरोना लस घेण्यासाठी दिवसेंदिवस नागरिकांची लसीकरण केंद्रांवर गर्दी होत आहे. अशातच ठाणे शहरात कोविशिल्ड लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने तिचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी मात्र या लसीचा दुसरा डोस देण्याइतका साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.

 दरम्यान, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपलब्ध असलेल्या लसींबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांना विचारले असता, कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, तसेच पहिला डोस कोविशिल्डचा घेणाऱ्या नागरिकांनी विनाकारण चिंतीत होण्याचे कारण नसल्याचे सांगून त्यांना दुसरा डोसदेखील कोविशिल्डचाच दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसthaneठाणे