शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त महिन्याला एखादे पुस्तक तरी वाचा : डॉ. विजया वाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 16:37 IST

पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त महिन्याला एखादे पुस्तक तरी वाचा असा सल्ला डॉ. विजया वाड यांनी विद्यार्थ्यांना दिला.

ठळक मुद्देपाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त महिन्याला एखादे पुस्तक तरी वाचा : डॉ. विजया वाडज्ञानप्रसारिणी शाळेत शनिवारी पहिले अ. भा. बालसाहित्य संमेलन डॉ. वाड यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन

ठाणे: पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त महिन्याला एखादे पुस्तक तरी वाचा, शाळेत असणाऱ्या ग्रंथालयाचा उपयोग करा, त्यातील विविध विषयांवरची पुस्तके वाचा असे आवाहन ज्येष्ठ बालसाहित्यिकाडॉ. विजया वाड यांनी विद्यार्थ्यांना केले. ज्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुसत्के वाचली, त्यांचे फोटो फलकावर लावा त्यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल अशी सूचना त्यांनी शिक्षिकांनाही केली.       पाणिनी फाऊंडेशन आयोजित कळवा येथील ज्ञानप्रसारिणी शाळेत शनिवारी पहिले अ. भा. बालसाहित्य संमेलन पार पडले. सकाळच्या सत्रात डॉ. वाड यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. डॉ. वाड यांनी विद्यार्थ्यांकडून ‘एक पुस्तक वाचू बाबा दोन पुस्तके वाचू’ ही कविता म्हणवून घेतली. संमेलनाची सुरूवात ग्रंथदिंडीने झाली. ही दिंडी शाळेच्या आवारात काढण्यात आली होती. पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी या दिंडीचे भोई झाले होते. त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. प्रा. बाळासाहेब खोल्लम म्हणाले, बालकवितांनी मुलांचे भावविश्व समृद्ध व्हायला मदत होते, मुलांचे कविसंमेलन हे या संमेलनातील विशेष बाब होती. कवयित्री सुनिला मोहनदास यांनी हे संमेलन पाहून माझ्या शाळेचे दिवस आठवले अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. वाचन संस्कृती जपण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. टीव्हीपेक्षा पुस्तकांतील वाड्.मय हे मोठे असते, त्यामुळे पुस्तकांशी गोडी करा, स्पर्धांमध्ये सहभागी व्हा, बाह्यरंगामुळे नाही तर अंतरंगामुळे आयुष्याचे चित्र सुंदर होत जाते, आळसपणा सोडा म्हणजे तुम्हाला नक्की यश मिळेल असा सल्ला बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना दिला. पाणिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा संगीता चव्हाण म्हणाल्या, वाचनाची आवड जोपासा कारण वाचन हेच आपल्याला घडवते. भूमिका शिंदे या विद्याथीर्नीने संमेलनाचे सुत्रसंचालन केले.------------------------------------फोटो : बालसाहित्य संमेलन

टॅग्स :thaneठाणेliteratureसाहित्यMaharashtraमहाराष्ट्र