शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १३४२ नव्या रुग्णांची भर; ३२ जणांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 20:49 IST

ठाणे शहरात ३६९ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. या शहरात ४० हजार ८६१ रुग्णं आतापर्यंत नोंदले आहे.

ठाणे: कोरोनाचे एक हजार ३४२ रुग्ण जिल्ह्यात रविवारी सापडले आहेत.त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ९१ हजार ८२५ रुग्ण झाले आहेत. तर, ३२ जणांचा आज मृत्यू झाल्यामुळे आता जिल्ह्यातील मृतांची संख्या चार हजार ८४६ झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. 

ठाणे शहरात ३६९ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. या शहरात ४० हजार ८६१ रुग्णं आतापर्यंत नोंदले आहे. तर,पाच मृत्यू आज झाल्यामुळे एक हजार ६६ मृत्यूंची नोंद केली आहे. कल्याण डोंबिवलीला ३११ रुग्णांची नव्याने वाढ झाली असून आठ जणांचे मृत्यू झाले आहे. या शहरांत आतापर्यंत ४६ हजार १८७ रुग्ण बाधीत रुग्ण असून मृतांची संख्या ९०३ झाली आहे.          उल्हासनगरात ४१ नवे रुग्ण तर दोन मृत्यू झाले आहेत. आता एकूण रुग्णांची संख्या नऊ हजार ६४१ असून मृतांची संख्या ३१७ झाली आहे. भिवंडीला ६५ रुग्ण नव्याने आढळले असून एक मृत्यू आज झाला आहे. या शहरात बाधीत पाच हजार ४५८ रुग्णांची, तर, ३२३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मीरा भाईंदरला ११२ रुग्ण सापडले  असून पाच मृत्यू झाले आहे. तर, बाधितांची संख्या आता २० हजार ३८८ झाली असून मृतांची संख्या ६३४ पर्यंत गेली आहे. 

अंबरनाथमध्ये ३४ रुग्ण आज आढळले असून तीन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आता बाधीत सहा हजार ७६१ रुग्ण असून २४४ मृत्यू आजपर्यंत झाले आहे. बदलापूरमध्ये ३९ रुग्ण नव्याने सापडले असून.  बाधीत रुग्ण सहा हजार ७०५ झाले आहेत. या शहरात आजही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे मृत्यूची संख्या ७७ कायम आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज ९९ रुग्ण नव्याने वाढले आहे. तर, एकाचही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत बाधीत रुग्ण १५ हजार ४८० झाले आहेत. तर मृत्यू संख्या ४६५ नोंदवण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे