शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अदानी कंपनीने वीज दरवाढ मागे घ्यावी; काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:22 IST

१५ डिसेंबरचे अल्टिमेटम, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

भाईंदर : मीरा-भाईंदरला वीजपुरवठा करणारी तत्कालिन रिलायन्स एनर्जी ही कंपनी ताब्यात घेताच अदानी इलेक्ट्रीसिटी कंपनीने वीजदरात तब्बल १८ टक्के वाढ केली. ही दरवाढ बेकायदा असल्याचा दावा करत ती त्वरित मागे घेण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. ती १५ डिसेंबरपर्यंत मान्य न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी दिला आहे.दर चार वर्षांनी वीज नियामक आयोगाकडून पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना दरवाढ करण्यास परवानगी दिली जाते. त्याचा दर ०.२५ टक्के इतका अपेक्षित असतो. परंतु, त्यात यंदा भरमसाठ वाढ करून ग्राहकाच्या माथी अव्वाच्यासवा वाढीव दराचे वीज बिल दिल्याचे सावंत यांनी सांगितले.पूर्वी शहराला रिलायन्स एनर्जी कंपनीकडून वीजपुरवठा केला जात होता. ही कंपनी अदानी इलेक्ट्रीसिटी मुंबई लिमिटेड या कंपनीने आॅगस्ट २०१८ मध्ये ताब्यात घेतली. यानंतर कंपनीने वीज दरात सरसकट १८ टक्के वाढ करून ग्राहकांच्या माथी वाढीव दराची बिले मारली आहेत. यामुळे ग्राहक त्रस्त झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.कंपनीने केलेली वीजदरवाढ बेकायदा असून ती वीज नियामक आयोगाच्या कायद्याचे उल्लंघन करणारी असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे. दरवाढ मागे घेऊन वीज नियामक आयोगाच्या परवानगीनेच ती लागू करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. ही दरवाढ मागे घेण्यासाठी सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अदानी इलेक्ट्रीसिटीच्या भार्इंदर येथील उत्तर विभागीय कार्यालयातील अधिकाºयांची मंगळवारी भेट घेत त्यांना निवेदन दिले.ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी २४ तास हेल्पलाईन सुरूयाबाबत कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विजेंद्र भावसार यांनी सांगितले की, तत्कालिन रिलायन्स एनर्जी कंपनीने २२ डिसेंबर २०१७ रोजी आयोगाकडे वीजदरवाढीची याचिका दाखल केली होती. त्यावर २ आॅगस्ट २०१८ रोजी सुनावणी होऊन आयोगाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. २८ आॅगस्ट रोजी ही कंपनी अदानी इलेक्ट्रीसिटीने ताब्यात घेतल्यानंतर आयोगाने १२ सप्टेंबरला दरवाढीचा निर्णय दिला.तो १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आला. त्यातच आॅक्टोबर हिटमुळे वीजवापर वाढल्याने शुल्क वाढले. त्यानुसारच ग्राहकांना बिले दिली असून त्यात दरवाढीपेक्षा जास्त तफावत असल्यास ती पुढील बिलातून आपोआप वळती केली जाते. याबाबत ग्राहकांचे शंका निरासन करण्यासाठी कंपनीने १५ डिसेंबरपर्यंत शिबिरांचे आयोजन केले असून २४ तास हेल्पलाईनसुद्धा सुरू केली आहे.

टॅग्स :electricityवीजbhayandarभाइंदरcongressकाँग्रेस