शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

अभिनय कट्टयावर अवतरली पंढरी, अभिनय कट्ट्याच्या ४० कलाकारांनी गाजवला कट्टा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 16:37 IST

गेली अनेक वर्ष सातत्याने नवनवीन आणि दर्जेदार उपक्रम अभिनय कट्ट्यावर राबविले जातात.

ठळक मुद्देअभिनय कट्ट्याच्या ४० कलाकारांनी गाजवला कट्टा अभिनय कट्टयावर अवतरली पंढरीआध्यात्मिक कार्यक्रम कलेच्या मध्यमातून सादर होणे गरजेचे - किरण नाकती

ठाणे :यंदाच्या कट्ट्यावर आषाढी वारी निमित्त "विठ्ठला विठ्ठला"या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कट्ट्याच्या बालसंस्कार शास्त्राच्या विद्यार्थ्यानी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

     विठ्ठल नामाची शाळा भरली या गाण्यावर एका नास्तिक विद्यार्थ्याची विठ्ठलाच्या चमत्कारामुळे आस्तिक झाल्याची गोष्ट नृत्याच्या माध्यमातून दाखवली गेली.यात श्रेयस साळुंखे , अर्णव पवार, प्रथम नाईक, सई कदम, प्रांजल धारला, आर्य माळवे, वैष्णवी चेउलकर , पूर्वा तटकरे, चिन्मय मौर्य , अद्वैत मापगावकर , निमिष पिंपरकर यांनी सहभाग घेतला , याचे नृत्यदिग्दर्शन परेश दळवी याने केले. या सोबतच दिव्यांग कला केंद्राच्या भूषण गुप्ते, अविनाश मुंगशे, निशांत गोखले, संकेत भोसले, गौरव राणे, अनमय मेत्री, पार्थ खडकबाण, आरती गोडबोले, जान्हवी कदम,ऋतुजा गांधी, अपूर्वा दुर्गुळे या विद्यार्थ्यानी माऊली माऊली या नृत्याच्या सादरीकरणाने उपस्थित सर्वच रसिक प्रेक्षकांना पंढरपूरला गेल्याचा आनंद दिला व दाखवून दिलं की ही सर्वच मुलं खरंच सर्वच बाबतीत  विशेष उल्लेखनीय कामगिरी करू शकतात.  उपस्थित सर्वच  रसिकांची उभं राहून टाळ्या वाजवून दाद दिली. अभिनय कट्टा संस्कार शास्त्र अकॅडमीतील महिला कलाकारांनी रावणाचा वनवास हि विनोदी एकांकिका सादर केली.नाटक बसवताना झालेली दमछाक आणि अचानक घडणारे विनोदी प्रसंग या नाटकात पाहायला मिळाले.आरती ताथवडकर - सेक्रेटरी, मौसमी घाणेकर- राम, रोशनी उंबरसाडे-वशिष्ठ मुनी, रोहिणी थोरात- शोभा, साक्षी महाडिक- मंगल, विजया साळुंके-सीता ,न्यूतन लंके-रावण या सर्वच कलाकारांनी आपल्या जबरदस्त टायमिंगमुळे रसिकांना विनोदाची मेजवानी दिली. या वेळी कट्ट्याचे निवेदन माधुरी कोळी यांनी केले.सहदेव कोळंबकर आणि कुणाल पगारे यांनी "माऊली" हि द्वीपात्री सादर केली.आपल्याला मुलगी होणार हे लक्षात येताच स्त्रीभ्रूण हत्या करण्याचे मनाशी ठरवलेल्या एका गृहस्थाला साक्षात विठ्ठल येऊन स्त्रीचे महत्व कसे पटवून देतो व माऊली हे सुद्धा स्त्रीचे रूप आहे आणि मीच तुझ्या मुलीच्या रुपात जन्म घेणार असे सांगतो आणि तो गृहस्थ विठ्ठलाचे आभार मानतो व नतमस्तक होऊन पांडुरंगाची माफी मागतो, या द्विपात्रीत विठ्ठल सहदेव कोलंबकर व गृहस्थ कुणाल पगारे याने  साकारला. अशा पद्धतीने अभिनय कट्ट्याच्या एकूण ४० कलाकारांनी ३८६ क्रमांकाचा कट्टा विठ्ठलाच्या नामस्मरणाने गाजवला. आषाढी वारीला प्रत्येकालाच विठ्ठलाचे दर्शन मिळेल असे नाही पण आपण आपल्या कलेच्या माध्यमातुन विठ्ठला पर्यंत पोहचू शकतो.कामात देव शोधला कि देवच आपल्याला शोधत येऊ शकतो.म्हणून असे आध्यात्मिक कार्यक्रम कलेच्या मध्यमातून सादर होणे गरजेचे आहे असे आयोजक किरण नाकती यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMaharashtraमहाराष्ट्र