शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीतील मुलेही उन्हाळी शिबिरात , ठाणे सिटीझन फाउंडेशनचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 06:46 IST

अनेक मुले हजारो रुपये शुल्क भरून उन्हाळी शिबिरात दाखल झाली आहेत. झोपडपट्टी वस्तीतील मुलांना मात्र पैशांअभावी शिबिरात सहभागी होता येत नाही.

ठाणे : अनेक मुले हजारो रुपये शुल्क भरून उन्हाळी शिबिरात दाखल झाली आहेत. झोपडपट्टी वस्तीतील मुलांना मात्र पैशांअभावी शिबिरात सहभागी होता येत नाही. अशा मुलांसाठी ठाणे सिटीझन फाउंडेशनने पाचदिवसीय मोफत उन्हाळी शिबिर उपक्रम हाती घेतला असून त्याचा सुमारे १५० मुले आनंद लुटत आहेत.सुट्यांचे दिवस सुरू असून सर्वत्र उन्हाळी शिबिरांचे पीक आले आहे. शिबिराचे आयोजक त्याला चांगले शुल्कही आकारतात. हे शुल्क भरणे सामान्यांना, झोपडपट्टीतील सगळ्याच मुलांना शक्य होत नाही. हे ओळखून ठाणे सिटीझन फाउंडेशन, महाराष्टÑ गो ग्रीन फाऊंडेशन आणि कॅसबर डान्स अ‍ॅकॅडमी यांनी संयुक्त विद्यमाने झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांसाठी उन्हाळी शिबिर आयोजिले. पहिल्या टप्प्यातील या शिबिरात जानकादेवीनगर येथील मुलांना सहभागी करून घेण्यात आले असून लिटिल फ्लॉवर हायस्कूल येथे हे शिबिर भरते. मुलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून ती आवडीने सहभागी झाली आहेत. महाराष्टÑदिनी या शिबिराचे उद्घाटन ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जोशी यांनी मुलांच्या उत्साहाचे कौतुक करत फाउंडेशनच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. ५ ते १५ वयोगटांतील एकूण सुमारे १५० मुले सहभागी झाली आहेत. शिबिरात मुलांना नृत्य, योगा, संवादकौशल्य, वक्तृत्व, कला, क्रीडा याचे प्रशिक्षण दिले जात आहे. मुलांना व्यक्तिमत्त्व विकासाचेही धडे दिले जात आहे. याचबरोबर झोपडपट्टीतील मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार आहे. आपापली वसाहत स्वच्छ राहण्यासाठी सुरुवात मुलांनी स्वत:पासून, घरापासून केली पाहिजे. या उद्देशाने त्यांना ओला-सुका कचरा वर्गीकरणाचे धडे शिबिरात दिले गेले. अनेक मुलांनी कचरा इतरत्र न फेकता कचरा डब्यातच साठवण्याची प्रतिज्ञा घेतली. तसेच ही मुले रविवारी आपापल्या परिसरात रॅली काढून स्वच्छेतबाबत जागृती करणार आहेत.शनिवारी या शिबिराचा समारोप होणार असून पुढील दिवसांत इतर झोपडपट्टी वसाहतीतील मुलांसाठी अशाच प्रकारची शिबिरे आयोजण्याचा ठाणे सिटीझन फाउंडेशनचा मानस आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीthaneठाणे