ठाणे : इंदिरानगर नाका ते कामगार हॉस्पिटलपर्यंत रस्त्यावर आणि पदपथांवर ठाण मांडून बसणाऱ्या गॅरेजवाल्यांवर तसेच फेरीवाल्यांवर आता कारवाई होणार आहे. स्थायीच्या बैठकीत झालेल्या चर्चेअंती स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांनी कारवाईचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. ठाणे स्थानक तसेच शहरातील विविध भागांत जाण्यासाठी नागरिक याच मार्गाचा वापर करतात. तसेच वागळे आगार आणि लोकमान्यनगर डेपोमधून सुटणाऱ्या ठाणे परिवहनच्या अनेक बसगाड्यांची याचमार्गे वाहतूक सुरू असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून इंदिरानगर भागातील रस्ता आणि पदपथ फेरीवाल्यांनी गिळंकृत केला आहे.
फूटपाथ, रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर होणार कारवाई
By admin | Updated: August 14, 2015 23:42 IST