शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

प्रिंटरवरच उगारणार कारवाईचा बडगा; बेकायदा बॅनरबाजीला बसवणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 02:43 IST

मीरा-भार्इंदर आयुक्तांचा निर्णय

मीरा रोड : मुंबई उच्च न्यायालयाने सातत्याने बेकायदा बॅनर आणि बॅनरबाज लोकप्रतिनिधी आदींवर कारवाईचे आदेश देऊनही मीरा - भार्इंदरमध्ये सर्रास बेकायदा बॅनर लावले जात आहेत. मात्र, आयुक्त बालाजी खतगावकर यांनी यासंदर्भात आदेश दिल्यानंतर लागलेले बॅनर काढण्याची कारवाई प्रशासनाने केली. या बेकायदा बॅनरबाजीला चाप लावण्यासाठी आयुक्तांनी थेट प्रिंटरवरच कारवाईचा बडगा उगारण्याचा रामबाण उपाय शोधला असून त्याची बैठक बोलावली आहे.सवंग आणि फुकटच्या प्रसिद्धीसाठी मीरा भार्इंदरमध्ये महापौर, आमदार, नगरसेवक, राजकीय तसेच संस्थांचे पदाधिकारी यांकडून सर्रास बेकायदेशी बॅनर लावले जात आहेत. यामुळे शहर विदू्रप झाले आहे. पदपथ, चौक, सिग्नल, वाहतूक बेट, रस्ते, वीजेचे खांब, झाडे येथे उघडपणे असे बेकायदा बॅनर लावले जातात. यामुळे रहदारी तसेच वाहतुकीला नेहमीच अडथळा होतो. झाडांवर बॅनर लावताना फांद्या तोडणे, तार आणि दोऱ्यांनी बांधणे, खिळे ठोकणे असे प्रकार करून झाडांना इजा पोहोचवली जाते. बेकायदा बॅनरबाजीमुळे लोकप्रतिनिधी, संस्था हे महापालिकेचे परवानगी शुल्क बुडवत आहेत. शिवाय लावलेले बॅनर पालिकेलाच काढावे लागत असल्याने महसूल तर बुडतोच शिवाय बॅनर काढायच्या खर्चाचा भुर्दंड देखील सोसावा लागतो.मुंबई उच्च न्यायालयाने सातत्याने बेकायदा बॅनर आणि बॅनरबाज लोकप्रतिनिधींवर कारवाईचे आदेश देऊनही मीरा भार्इंदरमध्ये खुद्द महापौर डिम्पल मेहता, आ. नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक, सर्वच सभापती - नगरसेवक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी - कार्यकर्ते, संस्थांचे पदाधिकारी यांकडून न्यायालयीन आदेशांना केराची टोपली दाखवली जात आहे. लोकप्रतिनिधी, राजकारणी आणि संस्थांनीच शहरात बेकायदा बॅनर लावून विद्रुपीकरण चालवले आहे. लोकप्रतिनिधी, राजकारणीच बेकायदा बॅनरबाजी करत असल्याने पालिका अधिकारी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करतात. पालिका प्रशासनाच्या बोटचेपेपणामुळे शहरात बॅनरबाज मोकाट असून लोकप्रतिनिधी निर्ढावले आहेत. इतके बॅनर शहरात लागत असताना पालिकेने एकाही लोकप्रतिनिधीवर बेकायदा बॅनरचा गुन्हा दाखल केलेला नाही.या बेकायदा बॅनरबाजीबद्दल अखेर आयुक्त खतगावकर यांच्याकडे तक्र ार गेली. आणि त्यांनी अतिक्र मण विभाग प्रमुख संजय दोंदे आणि संबंधितांना कारवाईचे आदेश दिले. त्या नंतर काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात लागलेले बेकायदा बॅनर काढण्याची कारवाई पालिकेने सुरू केली. परंतु अजून या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास टोलवाटोलवी सुरू असल्याचे सत्यकाम फाउंडेशनचे कृष्णा गुप्ता म्हणाले. बॅनर विरोधात सतत तक्र ारी करून देखील कारवाई होत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.दरम्यान बॅनरबाजीला आळा घालण्यासाठी आयुक्त खतगावकर यांनी थेट मुळावरच कारवाईचा पवित्रा घेतला आहे. शहरात बॅनर छापणाºया प्रिंटरनाच आयुक्तांनी कारवाईच्या रडारवर घेतले आहे. बॅनर छापणारे हे प्रिंटरच शहरात सर्वत्र बॅनर लावण्याचे काम देखील करतात.पालिकेची परवानगीचा क्र मांक, मुदत तारीख , परवानगी धारकाचे नाव आदी बॅनरवर छापणे बंधनकारक असते. झाडं, सिग्नल, विजेचे खांब, रस्ता, वाहतूक बेट येथे बॅनर लावू नये याची देखील या प्रिंटरना पूर्ण कल्पना असते. तरीही बॅनर छापताना त्यावर पालिकेच्या मंजुरीचा जावक क्र मांक, मुदत, संख्या आदी काहीच छापत नाहीत. लावलेले बॅनर देखील ते काढून घेत नाहीत.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकmira roadमीरा रोड