शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

कर्णकर्कश हॉर्न आणि फटाके सायलेन्सर लावणाऱ्या दुचाकींवरील कारवाई कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:54 IST

कल्याण : काही मिनिटांपुरती जरी वाहतूक थांबली तरी कर्णकर्कश हॉर्न वाजवत राहण्याचे फॅड वाहनचालकांमध्ये, विशेष करून दुचाकीस्वारांमध्ये वाढले ...

कल्याण : काही मिनिटांपुरती जरी वाहतूक थांबली तरी कर्णकर्कश हॉर्न वाजवत राहण्याचे फॅड वाहनचालकांमध्ये, विशेष करून दुचाकीस्वारांमध्ये वाढले आहे. पूर्ण रस्ता काही सेकंदातच मोकळा व्हावा, यासाठी हॉर्न वाजवण्याचा सपाटा सुरूच असतो. अशा प्रकारे ध्वनिप्रदूषण करणाऱ्या आणि इतर वाहनचालकांना अस्वस्थ करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात ठोस कारवाई अपेक्षित असताना कल्याण आरटीओ परिक्षेत्राचा आढावा घेता या ठिकाणी फारशी कारवाई होत नसल्याने संबंधित वाहनचालकांना मोकळे रान मिळाले आहे. गेल्या वर्षभरातील आकडेवारी पाहता कर्णकर्कश हॉर्न वाजविल्याप्रकरणी केवळ २७ जणांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात सहा ते सात महिने कारवाई झाली नसल्याचे सांगितले जात असले, तरी सद्य:स्थितीला कर्णकर्कश हॉर्न आणि फटाकेदार सायलेन्सरचे फुटलेले पेव पाहता कारवाईचे दावे कागदावरच असल्याचे स्पष्ट होत आहे.

सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजाचे हॉर्न वाजवून किंवा सायलेन्सरद्वारे फटाके फोडून लोकांना आकर्षित करणे एक फॅशन झाली आहे. शहरातून हॉर्नचा आवाज करत वेगाने गाडी चालविण्याची क्रेझ युवकांमध्ये आहे. एकमेकांना खुन्नस देण्यासाठी हॉर्न वाजवण्याचे प्रकारही घडतात. बरेचदा याचे रूपांतर वादात होण्याचेही प्रकारही घडलेले आहेत. वाहतूक नियमांनुसार हॉर्न कधी व कशासाठी वाजवावेत, कुठे वाजवू नयेत, याचेही काही नियम आहेत. हॉस्पिटल, कोर्ट, सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज या ठिकाणी ‘नो हॉर्न’ असा फलक लावलेला असतो. परंतु या ठिकाणीही नियम मोडत हॉर्न वाजविला जातो. काही दुचाकींना पोलिसांचा सायरन लावला जातो. कोंडीतून पुढे जाण्यासाठी त्याचा वापर केला जातो, पण त्याकडेही यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. कोरोनामुळे गेली सहा ते सात महिने कारवाईत काही प्रमाणात शिथिलता आल्याने ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे.

------------------------------------

कारवाईत आर्थिक दंडाची तरतूद

शहरात दुचाकी वाहनधारकांची संख्या कमालीची वाढली असून वाहनांमध्ये मॉडीफिकेशन करून जास्त आवाजाचे सायलेन्सर आणि हॉर्न बसविले जात आहेत. मोटार वाहन कायद्यांतर्गत ध्वनिप्रदूषण करणारे कर्णकर्कश हॉर्न व फटाके फोडणारे सायलेन्सर असलेल्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. परंतु ठोस कारवाई होताना दिसत नाही. गेल्या वर्षभरात केवळ २७ जणांवर कल्याण आरटीओने कारवाई केली आहे.

------------------------------------

कारवाई होतेय कुठे?

कर्णकर्कश हॉर्न आणि सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यासारखा आवाज करणाऱ्यांविरोधात आरटीओप्रमाणे शहर वाहतूक शाखेच्या वतीनेही कारवाई केली जाते. परंतु वर्षभरात झालेल्या कारवाईची माहिती वाहतूक शाखेकडून मिळू शकली नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणांकडून केले जाणारे कारवाईचे दावे कितपत खरे आहेत, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

------------------------------------

विशेष मोहीम

आमच्या विभागाकडून कारवाई सुरूच असते, त्याचबरोबर वाहतूक शाखाही कारवाई करते. मागील आठवड्यातच आरटीओ विभागांतर्गत सायलेन्सरमध्ये बदल करून मोठे आवाज करणाऱ्या दुचाकीचालकांविरोधात कारवाई केली आहे. पुढील काही दिवसांत ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे.

- तानाजी चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण

------------------------------------------------------